हिंदकेसरी मारुती माने भाऊ विरुद्ध पाकिस्तानचा बलाढय मल्ल सादिक पंजाबी लढतीचा चित्तथरारक किस्सा

''सादिक पंजाबीला दाखवला उत्तरेचा रस्ता''

सादिक हा उत्तरेतील पाकिस्तानचा पैलवान. वडील निका गुलाम महमद आजा  हे सुप्रसिध्द पैलवानाच. अमृतसर लाहोर या प्रांतातील नामवंत माल्लाना असमान दाखवून निका पैलवानी सादिक ला आणले ते दक्षिणेतील कुस्तीपंढरी कोल्हापुरातच. 
कोल्हापुरात मुक्कामी आल्यानंतर त्याने पहिली धडक दिली ती कराडच्या रामराव मुळीक यांचा पठ्ठा राघू बनपुरी याला असमान दाखवून. 
पुन्हा सांगलीच्या विष्णुपंत सावर्डेकर अप्पा याच्याशी दोनदा कुस्ती केली,पहिल्यांदा अप्पांनी सादिक ला पाडले ,मात्र परत हीच कुस्ती  लावून सादिक ने आपण अजिंक्य आहोत हे आप्पाना असमान दाखवून सिद्ध केले. 
आता मात्र कुस्तीक्षेत्राला हादरा बसू लागला. मारुती वडार यांना असमान दाखवून सादिकची कुस्ती ठरली महमद हानिफ याच्याबरोबर. 
महमद हानिफ  याला सुध्दा काही क्षणात चीतपट केले. 
पुढे पुण्याच्या रामचंद्र बिडकर यालाही चीत करून सादिक ने सार्या महाराष्ट्रालाच आव्हान दिले. 
हिंदकेसरी गणपतराव आंधळ्काराना हे असह्य झाले आणि त्याने प्राणपणाने सादिकबरोबर निकराची झुंझ दिली,मात्र कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आल्याने सादिक पुन्हा अजिंक्यच ठरला. 
श्रीपती खांचनाळे याच्याशी १ तास लढून त्यांच्यावरही सादिक पंजाबी ने विजय मिळवला. 
उत्तरेतील कोल्हापूर अश्रायीत मल्ल चान्दिगीराम ,गोगा पंजाबी यावरही सादिक ने मात केली. 
आता काय करावे असा पर्ष्ण कोल्हापूर कर मंडळीना पडला. 
कोण  रोखणार हे वादळ ?
एक नाव सर्व वास्तदान्च्या तोंडून बाहेर पडले. 
हिंदकेसरी मारुती भाऊ माने. 
पण भाऊ तर कुस्ती सोडायच्या नादात होते.कित्येक महिने व्यायामही पुरेसा नव्हता. 
पण महाराष्ट्रावर सादिक ने घातलेला हा हल्ला भौनही सहन झाला नव्हता. मारुती भाऊ माने यांनी हे आव्हान स्वीकारले आणि कवठेपिरान या गावी पुन्हा लंगोट आवळला. 
कोल्हापूरहून कित्येक खास खास पैलवान भौना सराव द्यायला कोल्हापूरहून सांगलीत येऊ लागली,काहीही होवो सादिकला पाडायचेच हि जिद्दच जणू सर्वांच्यात होती. 
गोरापान पिळदार शरीर्याष्टीचा सादिक पंजाबी. कुस्तीतील जादुगार होता. kusti खेळताना चित्रविचित्र उड्या मारून प्रतिस्पर्ध्याला धाक बसवत असे. 
जेवढी पाहिजे तेवढीच चरबी अंगावर ,काय बोलू नजर लागावी असे शरीरयष्टी. 
दुसरीकडे मारुती माने म्हणजे कुस्ती भिश्माचार्याच. 
एका ठोक्यात प्रतिस्पर्धी गारद करण्यात भाऊंचा हातखंडा. 
व्यायामाच्गा आकडा हजारात असे ,खुराकही तितकाच. 
विशेष म्हणजे कवठे पिराण सारख्या खेड्यात सराव ,आपल्या हयातीत कधी गाव सोडले नाही. गावात राहून भल्या भल्यांची जिरवली यांनी. 
कुस्तीचा दिवस उजाडला. 
खासबाग मैदान खचाखच भरले होते. 
दोघांचीही खडाखडी सुरु लागली. अंगावर घामाने चिखल माखू लागला. 
आणि मग सुरु झाल्या सदिकाच्या अतिचपळ चाली आणि चित्रविचित्र उड्या. 
भाऊ मात्र स्थिर कुस्ती खेळत होते. 
जणू ते सादिकला सांगत होते कि तुझ्या कुस्तीत आता राम नाही. 
आणि सादिकाचे असेच प्रयत्न सुरु असतानाच भाउंनी सर्व टाकत पणाला लावून सदिकाचा पट काढून सादिकला असमान दाखवले. 
आणि शांतपणे कोणताही गर्व न बाळगता भाऊ मैदानाबाहेर आले. 
प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले. पण भाऊ शांत होते. 
याला म्हणतात पैलवान. सादिकला जरी चीत केले असले तरी सदिकची इज्जत ते करत होते,त्याची योग्यता ते ओळखून होते. 
पुढे मात्र सदिकाच्या वडील निका पंजाबी यांनी सादिका ला घेवून कोल्हापूर कायमचे सोडले ते परत कधीही न येण्यासाठीच. 


धन्यवाद 
@गणेश मानुगडे
९८५०९०२५७५

3 Comments

  1. जुन्या काळातील महान मल्लंची तुल्यबळ लढत
    ; कोणिही पाहताच अंगावर शहारे येतिल जनू काय यानां बजरंग बलि मारुतीचेच वरधान लाभलेले
    आशे मल्ल पुन्हा होणे नाही 🙏🙏👏

    ReplyDelete
  2. Durmil asa ek maharastra cha manik moti Wastad maruti mane

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form