यावर्षीची महाराष्ट्र केसरी पुण्यात होणार : महापौर पै.मुरलीधर मोहोळ अण्णा आयोजक
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मुहुर्त ठरला : पुण्याचे महापौर पै. मुरलीधर मोहोळ यांना स्पर्धा आयोजनाची संधी
➖➖➖➖➖
महाराष्ट्राच्या कुस्तीचा कुंभमेळा ज्या स्पर्धेला म्हटलं जात अशा मानाच्या या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मुहुर्त ठरला असुन डिसेंबर 2022 मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी पुण्याचे महापौर पै. मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आली....
आज पुण्यामध्ये खराडी येथे 17 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती त्या निवड चाचणीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे अध्यक्ष श्री संजय सिंग यांसकडुन महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे पत्र पै.मुरलीधर आण्णा मोहोळ यांना प्रदान देण्यात आले.
या प्रसंगी श्री.आण्णासाहेब पठारे , अर्जुन अवाॅर्डी पै.काकासाहेब पवार , माजी आमदार श्री बापुसाहेब पठारे , पै.हनुमंतभाऊ गावडे , पै.विलास कथुरे , हिंदकेसरी योगेश दोडके , विजय बराटे , पै. संदीपआप्पा भोंडवे , पै.नामदेव बडरे , पै. वैभव लांडगे , पै.शंकर कंधारे , पै. नामदेव लंगोटे , पै.माऊली मांगडे , पै. संदीप गरुड व इत्यादी पदाधिकारी व कुस्तीगीर उपस्थित होते.
खासदार श्री रामदास तडस साहेब यांनी या स्पर्धेसाठी पै.मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देऊन स्पर्धेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
[फोटो : पै.मुरलीधर मोहोळ,महापौर पुणे]
बातमी : पै.संदीप आप्पा भोंडवे
धन्यवाद
Team kustimallavidya