कुंडल चे कुस्ती मैदान मुसळधार पावसामुळे रद्द
कुंडल ता.पलूस जि.सांगली चे कुस्ती मैदान रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आले होते.हिंदुस्थानातील तगड्या जोडतील मल्लांचे मल्लयुद्ध सदर मैदानात होणार होते. तेलंगणा, आंध्र,कर्नाटक, पंजाब, हरियाणा,दिल्ली आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर कुस्ती शौकीन सकाळपासून मैदानाकडे येत होते.यावर्षी कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे कुस्ती मैदान थेट प्रक्षेपण करण्याची सोय देखील करण्यात आली होती.सकाळपासून रिपरिप सुरू असलेल्या पावसाने आयोजकांच्या मनात धाकधूक सुरू होती.बरोबर 2 वाजता लहान मोठ्या कुस्त्याना प्रारंभ झाला.
हळूहळू कुंडलचा डोंगर माणसांनी फुलू लागला.टिपरी घुमू लागली तसा श्रावणातील रिमझिम पावसाने थोडेसे उग्र रूप घेतले आणि पाऊस मुसळधार पडू लागला.आयोजकांनी माती भिजू नये याची दक्षता अगोदर घेतली होती.प्लास्टिक पेपर ने मैदान आच्छादित करण्यात आले.मात्र मैदान ओले झाले नाही तरी कुस्ती शौकीन बसण्याची जागा दलदलीत झाली.अखेर विचारांती आयोजकांनी सदर मैदान रद्द करुन पुढे घेऊ असे जाहीर केले.
दरम्यान जे पैलवान दिल्ली,हरियाणा दूरवरचा प्रवास करून आले होते तसेच महाराष्ट्रातील लहान मोठे इतर पैलवान ज्यांचे जाणे येणे,वाटखर्च याबाबत कमिटीने मिटिंग घेऊन सर्वांना जाणे येणे चे पैसे दिले.
मात्र दिल्लीतील पैलवान यांचा सदर मैदानासाठी विमानखर्च तसेच 2 दिवस गेल्याने यासह पुणे ते कुंडल येणे जाणे अधिक गेल्याने त्यांना आयोजकांनी बक्षिसांपैकी काही टक्के रक्कम देऊन सर्वांना समाधानपूर्वक मार्गस्थ केले.
मात्र अश्या तगड्या लढती झाल्या असत्या तर कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असते अशी भावना कुस्ती प्रेमींनी व्यक्त केली.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Team kustimallavidya