नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्र कुस्ती संघाला मा.श्री.अजितदादा पवार यांच्याकडून शुभेच्छा
दिनांक 29 सप्टेंबर 2022 पासून गांधीनगर गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल गेम्स या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती संघाला आज म्हाळुंगे बालेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या.
नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्र कुस्ती संघाचे सराव शिबीर सह्याद्री कुस्ती संकुल वारजे येथे सुरू आहे.
महाराष्ट्राला मातीतल्या कुस्तीची असणारी भव्यदिव्य परंपरा कायम राखत आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील महाराष्ट्रातील मल्ल पदक जिंकून आणत आहेत ही समाधानकारक बाब आहे.
आज महाराष्ट्र कुस्ती संघाला शुभेच्छा देताना अजितदादा म्हणाले की महाराष्ट्राच्या कुस्तीला मोठी परंपरा आहे व प्रतिभावान खेळाडू आजही महाराष्ट्रात तयार होत आहेत.आगामी नॅशनल गेम्स ला त्यांनी महाराष्ट्र कुस्ती संघाला शुभेच्छा दिल्या.
VIDEO पहा.
धन्यवाद
Team kustimallavidya