कुस्ती क्षेत्रात अनेक पराक्रम रचणारे कोल्हापूरचे युवराज तात्या पाटील

कुस्ती क्षेत्रात अनेक पराक्रम रचणारे कोल्हापूरचे युवराज तात्या पाटील
महाराष्ट्राची कुस्ती परंपरा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवरील अनेक मैदानात उधळणाऱया दिग्गज मल्लांची जी परंपरा आहे त्यात कुस्तीसम्राट युवराज राऊ पाटील यांचे नांव अगभागी आहे.
पैलवान युवराज यांचा जन्म कोपार्डे येथील शेतकरी कुटुंबात १९५६ मध्ये झाला. आजोबा गोंविंद पाटील, वडील राऊ पाटील व चुलते परशराम पाटील हे कुस्तीगीर होते. 
वयाच्या आठव्या वर्षी युवराज यांनी गावातील तालमीत कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. गावात चौथीपयतचे शिक्षण घेतल्यानंतर युवराजनां कोल्हापूरांतील मोतीबाग तालमीत सरावासाठी पाठवण्यात आले.
वयाच्या पंधराव्या वर्षी युवराज यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अलिबाग येथील अधिवेशनात भाग घेतला. यावेळी युवराज यांनी केलेल्या चमकदार कुस्त्यांमुळे 
तालीम संघाचे सचिव मा. बाळ गायकवाड यांनी कुस्तीचे धडे देण्यास सुरवात केली. मा. बाळासाहेबांनी अपार कष्ट घेऊन युवराज यांना घडवले. 
युवराज यांनी मोतीबाग तालमीत व्यायाम करून शरीर कमवले आणि कुस्तीच्या डावपेचांचे शिक्षण घेतले. 
युवराज देखणे होते, पण मर्दानी होते. शरीराने बलदंड होते, पण हालचालींत चपळ होते, एक दमदार मल्ल म्हणून ओळखले जायचे. निधड्या छातीचा जिद्दी पहेलवान अशी त्यांची प्रतिमा होती. 
कोल्हापुरच्या खासबाग मैदानावरील लाल मातीला आणि मोतीबाग तालमीला देशभर लौकीक मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
१९७३ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आखिल भारतीय पातळीवरील महान भारत केसरी कुस्ती स्पधे॔त कुमार गटात युवराज यांनी भाग घेतला होता. या स्पधे॔त त्यांनी सुवण॔पदक मिळवून दिल्लीकरांची 
वाहवा मिळवली. तेव्हा तत्कालीन केंदीय मंञी मा. यंशवंतराव चव्हाण यांनी या लहान वयातील मल्लाची चमक पाहून त्यांचा दिल्लीत गौरव केला. युवराज यांना महान भारत केसरी दादू चौगुले,
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व डब्बल महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ यांच्यासारख्या दिग्गज पैलवानांचा सहवास व सरावासाठी सहकाय लाभले.
१९७४ साली ठाणे मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एक जादू घडली. एका पोरवयाच्या पैलवानाने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ठाणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 
१९ व्या वार्षीक अधिवेशनात कुस्ती शेञातील यशाचे शिखर गाठले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहा कुस्त्या करून युवराज यांनी अंतीम फेरीत धडक मारली. 
आणि अंतिम झुंज होणार होती सेनादलाच्या राष्ट्रीय व न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पधे॔तील सुवणपदक विजेता पैलवान पुण्याच्या रघुनाथ पवार यांच्याबरोबर. 
अतिशय रंगतदार झालेल्या या कुस्तीत पहिल्यापासूनच रघुनाथ पवार आक्रमक खेळत युवराज वर भारी पडत होते. 
मात्र अटीतटीच्या या सामन्यात युवराज यांनी रघुनाथ पवार यांना ७ वि. १ गुणांनी पराभूत करून गुणावर बाजी मारत वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी '' महाराष्ट्र केसरी'' च्या गदेवर आपल नांव कोरून 
एक इतिहास रचला. वयाच्या १६ व्या वर्षी '' महाराष्ट्र केसरी'' झालेले युवराज हे एकमेव पैलवान म्हणून आजही नावलौकिक आहे. 
वयाच्या १६ व्या वर्षी युवराज यांनी महाराष्ट्र केसरी हा बहुमान प्राप्त केला. इतक्या तरुण वयात एवढा मोठा बहुमान आजतागायत कोणी मिळवला नाही आणि युवराज यांचा विक्रम कोणी मोडून काढला नाही. 
१३ माच १९७६ रोजी युवराज यांची बेळगाव येथे भारत केसरी पैलवान विजयकुमार(अमृतसर, पंजाब)यांच्याशी लढत झाली. या लढतीत युवराज यांनी विजयकुमार यांच्यांवर एकलंगी डाव 
मारून नेञदीपक विजय मिळवला.
याच दरम्यान हिंदुस्थानात दिल्लीचे पैलवान सत्पालने वादळ निर्माण केलेले होते. त्या काळी धरलं त्याला सत्पाल पाडत होते. 
असे वाटू लागले कि हिंदुस्थानात त्याला लढणारा कोणीच शिल्लक नाही. 
उत्तरेतील महाबली सत्पालने त्या काळी देशातील नावाजलेल्या सर्व मल्लांना धूळ चारून आपला दबदबा निर्माण केला होता. 
दिल्लीचे हे वादळ महाराष्ट्रातील मराठी मैदानातदेखील आले होते. त्याला रोखायचे कसे आणि कोण रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. 
मात्र हे आव्हान पेलले ते हरिश्चंद्र बिराजदार मामांनी आणि सत्पाल ला चित केले. (बेळगांव मुक्कामी १९७७). 
त्यानंतर कोल्हापूरचा युवा मल्ल युवराज पाटील यांनीही महाबली सत्पाल यांना रोखण्याचे आव्हान स्वीकारले. कुस्ती ठरली
१ एपिल १९७८ साल. कुस्तीचे ठिकाण होते राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर. मंडळी त्यावेळी अशा कुस्त्या पाहायला तिकीट काढावे लागत असे. 
त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून ती कुस्ती पाहायला कुस्तीशौकीन आले होते. त्यावेळी कोल्हापूरातही सत्पाल यांचेही बरेच चाहते होते. 
या कुस्ती मध्ये युवराज पाटील यांनी लहान मुलाला ज्याप्रमाणे खेळवतात त्याप्रमाणे सत्पालला पुठ्या ( बँक थ्रो ) मारल्या. 
या लढतीत तुफानी ताकदीच्या युवराज यांनी सत्पालना आस्मान दाखविले. सत्पालना चितपट केल्यानंतर युवराज यांच्या विजयाची बातमी संपूण महाराष्ट्रात पसरली.
पुन्हा १० जानेवारी १९८२ मध्ये या दोन महाकाय मल्लांची कराड औगलेवाडी येथे लढत झाली. या लढतीत १०० किलो वजनाचा चपळ चित्ता युवराज यांनी सत्पालना चितपट करून भारतातील महान मल्ल 
असल्याचे सिध्द केले. युवराज यानां यावेळी मोठी पसिध्दी मिळाली. गामीण व शहरी भागात अनेक पालकांनी आपल्या मुलांची नांवे ‘युवराज’ ठेवली. गामीण भागात तर ‘युवराज’ नावांचे पीक आले.
१९८२ मध्ये युवराज व पशिक्षक पी.जी. पाटील पंजाब मधील पतियाळा येथे गेले होते. जेवण झाल्यांनंतर ते एका पानाच्या दुकानात गेले. पानाची आँड॔र दिल्यानंतर पशिक्षक पी. जी. पाटील 
यांचे लक्ष एका फोटो कडे गेले. दुकानात युवराज यांचा मोठा फोटो लावला होता. पी.जी. पाटील यांनी दुकानदाराला हा फोटो कुणाचा आहे हे विचारले. 
हा कोल्हापुरचा मोठा पैलवान युवराज असून पतियाळात त्यांचे अनेक चाहते असल्याचे दुकानदारांने सांगितले. युवराज चा फोटो का लावला असे विचारताच त्यांनी गुरूहनूमानसिंग यांचा पट्टा सत्पाल याचा पराभव केल्याचे सांगितले.
पी.जी. पाटील यांनी युवराजकडे बोट दाखवून फोटो लावलेला युवराज हाच असल्याचे सांगितले. दुकानदारांने युवराजकडे व फोटोकडे दोन ते तीन वेळा पाहून खाञी पटताच युवराज आल्याचे आरडत 
सवा॔ना सांगू लागला. अवघ्या पाच मिनीटात शंभर ते दीडशे लोक जमले. ते युवराजच्या हातात हात देऊन सत्पालचा पराभव केल्याबद्दल अभिनंदन करत होते. 
अखेर एका कट्यावर युवराज उभे राहून मोडक्या तोडक्या हिंदी भाषेत आभार मानून पतियाळाच्या कुस्ती शौकिनाना नमस्कार केला.
कोल्हापूर तालीम संघाने पुन्हा ११ फेबुवारी १९८४ रोजी राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर येथे पै. युवराज पाटील व पै. सत्पाल यांच्यांत लढत ठेवली. 
या मैदानात पै. युवराज यांनी मिळालेली संधी न सोडता केवळ 24 मिनिटांत सत्पालना लपेट डावावर पुन्हा पराभूत करून आस्मान दाखविले. आणि प्रेक्षकात एकाच जल्लोष उडाला. प्रेक्षकांनी तर मैदान डोक्यावर घेतले. 
शाब्बास युवराज! शाब्बास अशा आरोळय़ांनी खासबागेत जल्लोष सुरू झाला. अनेकांनी फेटे उडवून आनंद व्यक्त केला. युवराज युवराज जयघोष सुरू होता. युवराज यांनी मिळवलेला दमदार विजय 
पाहून पैसे फिटले अशी भावना व्यक्त करत कुस्तीप्रेमी घरी परतले आणि खासबागेच्या इतिहासात एका दमदार लढतीची नोंद झाली. आजही या कुस्तीची चर्चा जुने जाणते कुस्तीप्रेमी करताना दिसतात. 
हिंदकेसरी सतपालला चारी मुंड्या चीत करून अस्मान दाखवल्यावर सारा महाराष्ट्र आनंदाने नाचला होता. या विजया नंतर कोल्हापुरातुन त्यांची भव्य दिव्य अशी हत्तीवरून जंगी 
मिरवणूक काढली होती. अलीकडच्या काळात हत्तीवरून मिरवणूकीचे भाग्य फक्त युवराज यांनाच लाभले. 
युवराज यांनी सतपालला तीन वेळा लोळवून विजयाची हॅटट्रिक केली. 
त्यांनी सतपालचा केलेला पराभव म्हणजे त्यांच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील ती अद्वितीय व अविस्मरणीय कामगिरी होती. 
सत्पालला खरा उत्तरेचा रस्ता दाखवला तो महाराष्ट्र केसरी युवराज पाटील तात्या यांनी. 
या अजोड काया॔ची दखल घेऊन कुस्ती शौकिनांनीच त्यांना ‘कुस्तीसम्राट’ ही पदवी दिली.
युवराज पाटील हे महान मल्ल तर होतेच पण माणूस म्हणून ते सव श्रेष्ठ होते. कुस्तीत मोठे यश मिळूनही ते जमिनीवर होते. युवराज यांनी आपला नम व सालस स्वभाव कधीही सोडला नाही. पांढरा शट॔ पांढरी विजार अशा पेहरावात युवराज यांची स्वारी शहरात चालत फिरताना दिसायची.
आज एखादी कुस्ती जिंकली की पैलवान बुलेट घेऊन फिरतात. पण युवराज ह पायीच फिरायचे. त्यांचा लोकसगंह पचंड होता. कुणाणाचे अडल्या नडल्याचे काम करण्यास त्यांचे हात तत्पर असायचे. 
पोलीस ठाणे असो अथवा शासकीय कायालय युवराज नमपणे कायालयात जायचे. युवराज कायालयात आलेले पाहून अधिकारीही हरकून जायचा आणि गरिबाचे काम झटक्यात व्हायचे. युवराज यांची ही सेवा शेवटपयं॔त चालू होती.
कुस्तीला लागणारा बेडरपणा, शांत पण डावपेची स्वभाव, शक्ती आणि युक्तीची जोड युवराज यांना लाभली होती. 
युवराज हे अफाट ताकदीचे पैलवान होते. तितकेच ते चपळही होते. ते चौफेर कुस्ती करायचे. कुस्ती करताना कधीच मागे हटत नसत. आकमकपणे ते कुस्ती करायचे. 
यामुळे पतीस्पधी॔ पैलवानाच्या छातीत धडकी भरायची. युवराज मैदानात उतरणार आहे असं समजलकी मैदानाकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी लागायच्या. काही वेळातच मैदान तुंडूंब भरायचं. 
विशेष म्हणजे कुस्तीशौकीन तिकीट काढून यांची कुस्ती पहायला यायचे. तिकीट काढून कुस्ती पाहण्यासाठी येणारा कुस्तीशौकीन फक्त युवराज पाटील यांनाच लाभला.

धन्यवाद 
पै.गणेश मानुगडे 
कुस्ती मल्लविद्या
https://www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form