हिंदकेसरी पै.संतोष आबा वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
सुरली ता.कराड चे हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांचा वाढदिवस 22 सप्टेंबर 2022 रोजी होत आहे यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पैलवान संतोष वेताळ नेहमीच आपल्या वाढदिवसानिमित्त विधायक कामे करुन वाढदिवस साजरा करत असतात.यापूर्वी त्यांनी वृक्षारोपण, अन्नदान, जीवनावश्यक वस्तू वाटप इत्यादी कार्यक्रम यशस्वी केले आहेत.
आबा स्वतः सैदापूर याठिकाणी स्वतःचे कुस्ती संकुल चालवतात. आजमितीला येथे 80 ते 90 मल्ल सराव करत आहेत.आबांनी स्वतःच्या मुलींना देखील कुस्ती क्षेत्रात आणून महिला कुस्तीसाठी सुद्धा योगदान दिले आहे.
यावर्षी सुद्धा आबांचा वाढदिवस विधायक उपक्रमाने साजरा होणार आहे.
धन्यवाद
Team kustimallavidya