नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्र कुस्ती संघाचा विमानप्रवास : कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच शासनातर्फे खेळाडूंना विमानप्रवास सुविधा

नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्र कुस्ती संघाचा विमानप्रवास : कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच शासनातर्फे खेळाडूंना विमानप्रवास सुविधा
दिनांक 29 सप्टेंबर 2022 पासून गांधीनगर गुजरात येथे नॅशनल गेम्स सुरु होत आहेत.सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघ काल गुजरातकडे विमानाने रवाना झाला.कुस्तीच्या इतिहासात सर्व टीम च्याविमानाने  प्रवासाचा खर्च महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचनालाय व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशने उचलला आहे.
महाराष्ट्राच्या फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन, महिला कुस्ती इत्यादी कुस्ती प्रकारात महाराष्ट्र कुस्ती संघ नॅशनल गेम्स मध्ये प्रतिनिधित्व करत आहे.त्यांना स्पर्धेसाठी विमानप्रवास शासनातर्फे करण्यात आल्याने खेळाडूंच्या मुखावर आनंद दिसून येत होता.
यापूर्वी कुस्ती संघ अश्या मानाच्या स्पर्धेला जाताना रेल्वेत आरक्षण नसल्याने खूप त्रास सहन करावा लागल्याच्या बातम्या आपण वाचल्याचं असतील.मात्र नॅशनल गेम्स च्या या विमानप्रवासाच्या धर्तीवर यापूढे संबंधित क्रीडा संघटनांनी कुस्ती संघाला जर अश्या सुविधा दिल्या तर खेळाडूंचे मनोधैर्य नक्कीच उंचावले जाईल.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form