वय जास्त असूनही या पैलवानांनी जिंकले ऑलिंपिक पदके,कुस्तीसाठी वय,ब्रह्मचर्य,वातावरण,खुराक यासह जिंकायची मनोवृत्ती किती महत्वाची असते हे वाचा...
कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांना चांगले ठाऊक आहे की कुस्तीमध्ये रिझल्ट येण्यासाठी योग्य वय असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात तर वय आणि कुस्ती याचा घनिष्ठ संबंध जोडला जातो. कुस्ती आणि संसारिक जीवन व कुस्ती आणि ब्रह्मचर्य याचाही संबंध जोडून कुस्ती व कुस्ती क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना अनेक प्रश्न नेहमी सतावत असतात.
पण आजमीतिला अनेक पैलवान दीर्घकाळ कुस्ती करतात व त्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मानाच्या स्पर्धेत पदक सुद्धा जिंकून आणतात.अमेरिकेचे पैलवान यात अग्रेसर आहेत. त्यामुळे याचा विचार करत असताना सहज माझ्या मनात प्रश्न आला की असा कोणता पहिलवान आहे ज्याने वय जास्त असून देखील ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत कुस्ती या खेळामध्ये पदक जिंकले.
ही यादी आहे ज्यांनी वय जास्त असून देखील कुस्ती या खेळात ऑलम्पिक मध्ये पदक जिंकले होते.
1) फिनलँड देशाचे पैलवान एडॉल्फ लिंडफोर्स यांनी 1920 च्या अंटपर्व ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 82 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते,त्यावेळी त्यांचे वय 42 वर्षे होते.
2) 1972 च्या म्युनिच ओलंपिक मध्ये युरेशीचा पैलवान अनटोली रोस्टीन याने 100 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते त्यावेळी ते 40 वय वर्षाचे होते.
3) क्रिस कॅम्प बेल हे अमेरिकन पैलवान ज्यांनी 1992 च्या बरसे लोन ओलंपिक स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळात कांस्यपदक जिंकले. ज्यावेळी त्यांनी कास्यपदक जिंकले त्यावेळी त्यांचे वय वर्षे 38 होते.
या तीन पैलवानांच्या व्यतिरिक्त अनेक जण 37,35,34 वयोगटातील अनेक पैलवान आहेत ज्यांनी क्रिस्टल आणि ग्रीक रोमन कुस्ती प्रकारात ऑलिंपिक सारख्या मानाच्या कुस्ती स्पर्धेत पदक मिळवले.
बहुतांशी पैलवान हे अमेरिकन आहेत त्यामुळेच की काय आजच्या घडीला सुद्धा डेव्हिड टेलर आणि जॉर्डन बरोज सारखे पैलवान वयाच्या 35-36 व्या वर्षी देखील ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत भाग घेतात व देशासाठी पदक सुद्धा जिंकतात.
भारतासारख्या खंडपाय देशात व त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील समशितोष्म प्रदेशात व्यायाम,खुराक व उष्णता यानुसार शारीरिक जडणघडण्याची व्याख्या करता येऊ शकते. जिथे उष्णता जास्त तिथे थोडा व्यायाम केला तरी शरीर जास्त ऊर्जा खर्च करते व परिणाम शारीरिक क्षमतेवर होतो.
पण महाराष्ट्राच्या इतिहासावर आपण लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की शिवकालीन इतिहासात तानाजी मालुसरे यांचे शेलार मामा सुद्धा वय वर्ष 80-82 असून सुद्धा युद्धावर जात होते व तरुण असणाऱ्या उदयभान राठोड सारख्या सरदाराला युद्धात समोरासमोरच्या लढाईत हरवत होते.
त्यामुळे मला तर वाटते कोणताही खेळ हा वय अवलंबून आहेच पण त्याहीपेक्षा मनोवृत्तीवर अवलंबून आहे. तुमच्या खेळात सातत्य असेल तर दिसामासाने तुमचा अनुभव वाढत जातो व याचा उपयोग तुमच्या कारकिर्दीसाठी करता येऊ शकतो. त्यामुळे मनातील न्यूनगंड काढून सर्व पैलवानांनी दीर्घकाळ कुस्ती खेळली पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद
पै.गणेश मानुगड़े
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com