उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने साधला कुस्तीप्रेमींशी LIVE : अनेक प्रश्नांची दिली उत्तरे
महाराष्ट्राचा लाडका पैलवान,आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा पट्टा पैलवान किरण भगत यांने वाढदिवसानिमित्त कुस्ती-मल्लविद्या फेसबुक पेजद्वारे आपल्या चाहत्यांशी दिलखुलास संवाद साधला.
अनेक चाहत्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी कुंडल मुक्कामी पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध होणाऱ्या कुस्ती विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की माऊली व माजी अनेकदा कुस्ती झालेली आहे व ही कुस्ती सुद्धा अतिशय चांगली होईल.
पैलवान सिकंदर शेख विरुद्ध कुस्ती खेळायला आवडेल का असा प्रश्न विचारल्यानंतर किरण भगत म्हणाला की सिकंदर चालू घडीला एक चांगला पैलवान आहे व मला त्याच्याशी कुस्ती करायला सुद्धा नक्कीच आवडेल.
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.
आपण हा संवाद खालील व्हिडिओ द्वारे पाहू शकाल