त्याग ....
त्याग म्हणजे काय..? त्याग म्हणजे चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करणे अथवा त्या गोष्टींपासून दुर राहणे..
त्याग करण्यात येणा-या सगळ्याच गोष्टी वाईट नसतात.सविस्तर विचार करता याठिकाणी आवर्जुन सांगावं वाटतं.......कुस्ती क्षेञात टिकण्यासाठी तथा यश मिळविण्यासाठी त्याग वृत्ती असणे अत्यंत उपयुक्त आहे.त्याग केल्या जाणा-या दोन गोष्टी आहेत चांगल्या आणि वाईट....
तर चांगल्या गोष्टी कोणत्या ...? काहीतरी मिळविण्यासाठी आपले घर , आईवडील , पाहुणे राऊळे अर्थात माया .......माया ही चांगली गोष्ट आहे माञ काहीतरी मिळविण्यासाठी आपण काही काळ का होईना या गोष्टींचा त्याग करून आपण आपले ध्येय निश्चित साध्य करु शकतो....
आणि वाईट गोष्टी कोणत्या...? ह्या गोष्टी माञ सुटता सुटत नाहीत.... मोबाईल , गाडी , चमकेश शहरी दुनिया , करिअरला घातक मिञ मंडळ , सणासुदीच्या नावाखाली धिंगाना , अचानक जीवनात आलेले फुलपाखरु व अन्य या सर्व गोष्टींचा ज्याने त्याग केला तोच यशस्वी झाला....काही अपवाद वगळता या गोष्टींच्या मागे धावणारा ढोपरावर आला तरी उबदारी येत नाही ...म्हणुन या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं वाटतं की त्याग वृत्ती अंगी असेल तर कुस्तीच काय कोणत्याही क्षेञात तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहाणार नाही...
(यावर सविस्तर लिहणार आहे ...आता माञ एवढंच)
धन्यवाद ...!
MWC Pattern
कुस्ती मल्लविद्या महासंघ