पुण्यात 14 वर्षाखालील मॅटवरील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : 430 कुस्तीगीरांचा विक्रमी सहभाग
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड मर्यादित 14 वर्षाखालील मॅटवरील कुस्ती स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटक महाराष्ट्र केसरी,अंतरराष्ट्रीय पैलवान,शिव छत्रपती पुरस्कार सन्मानित,पै.अभिजीत कटके, युवा नेते पै.कुलदीप कोंडे,महान भारत केसरी पै.विजय गावडे, वस्ताद देवदास मारणे, सुभाष पोकळे, मुंबई महापौर केसरी पै.आबा काळे,पै.मनोहर मांगडे, पै.संतोष देशमुख, पै.दिलीप मोडक, पै.विकास(मामा) लगड, पै.कृष्णा बुचडे, पै.गणेश दांगट तसेच कुस्तीगीर संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव NIS कुस्ती कोच पै.मारुती मारकड,NIS कुस्ती कोच पै.जगमाल सिंग,NIS कुस्ती कुस्तीकोच पै.अमोल यादव,NIS कुस्ती कोच पै.वरूण त्यागी यांनी उत्कृष्ट खेळाडू निरीक्षक म्हणून भूमिका बजावली.सदर स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची रंगीत तालीम होती.पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड येथील स्थानिक कुमारवयीन कुस्तीगिरांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे महत्त्व समजावे म्हणून सदर स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपणास प्राविण्यप्राप्त करावयाचे असेल तर पायाभरणी चांगली असली पाहीजे हे सूत्र डोळ्यासमोर ठेऊन या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक 3 महिन्यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असुन अगदी लहानपणापासून जास्त कुस्ती स्पर्धेचा अनुभव मिळाल्याने छोटा कुस्तीगीर हा पुढे निर्भीड व कुस्ती कलेमध्ये हुशार होणार आहे ...
हिंदकेसरी पै योगेश दोडके, पै.हनुमंत गावडे, पै.संदीप भोंडवे पै.ज्ञानेश्वर(माऊली)मांगडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै.तात्यासाहेब भिंताडे यांनी उचलली होती.... पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर या तिन्ही कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते..
बातमी साभार : पै.ज्ञानेश्वर मांगडे वस्ताद
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com
Tags
पुणे कुस्ती बातम्या