2026 च्या व्हिक्टोरिया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतुन कुस्ती या कारणांमुळे हटवली गेली : कुस्ती क्षेत्रात नाराजगीचा सुर
राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली. यामध्ये २० खेळ आणि २६ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्यामध्ये कुस्ती या खेळाला वगळण्यात आल्याने राष्ट्रकुल सदस्य असणाऱ्या कुस्तीप्रेमी राष्ट्रात नाराजगीचा सूर दिसून येत आहे त्याऐवजी नेमबाजी खेळाला सामील करण्यात आले आहे जो 2022 च्या बर्मिगहम राष्ट्रकुल मधून हटवण्यात आला होता.
राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताला सर्वाधिक १३५ पदके (६३ सुवर्ण, ४४ रौप्य व २८ कांस्य) ही नेमबाजीत मिळाली आहे. २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकूण पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. या स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदके जिंकली होती, ज्यापैकी १६ पदके (७ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य) नेमबाजीत मिळाली होती.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवताना सर्व १२ वजनी गटांत पदके (६ सुवर्ण, १ रौप्य, ५ कांस्य) पटकावली होती.
2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबाबत खालील मुद्दे विचारात घेता येतील.
● 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा यजमान देश ऑस्ट्रेलिया आहे.
●यजमान देशाला स्पर्धेत कोणते खेळ निवडायचे याचा हक्क असतो.
● ऑस्ट्रेलिया देशात कुस्ती हा खेळ फारसा प्रचलित नाही.
●कुस्ती खेळ वगळून नेमबाजी हा खेळ सामील केला गेला.
हे खेळ सुद्धा होतील सामील
२०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेत नौकानयन, गोल्फ, बीएमएक्स सायकलिंग या क्रीडा प्रकारांचा प्रथमच समावेश करण्यात येणार आहे. तसेच या तिन्ही प्रकारांच्या पॅरा-स्पर्धा (अपंगांच्या) खेळवण्यासाठीही व्हिक्टोरिया राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजक प्रयत्नशील आहेत. १७ ते २९ मार्च या कालावधीत २०२६ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेच्या आयोजनाद्वारे व्हिक्टोरिया राज्याला तीन अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक महसूल मिळणे अपेक्षित आहे.
धन्यवाद
Kustimallavidya.com