बल्गेरिया मध्ये रंगली वृद्धांची जागतिक कुस्ती स्पर्धा : 47 देशातील मल्लांनी वेटरन वर्ल्ड चॅम्पियनशीप मध्ये सहभाग नोंदवला.

बल्गेरिया मध्ये रंगली वृद्धांची जागतिक कुस्ती स्पर्धा : 47 देशातील मल्लांनी वेटरन वर्ल्ड चॅम्पियनशीप मध्ये सहभाग नोंदवला.
बल्गेरिया देशातील प्लोवदीव शहरात दिनांक 4 ते 9 ऑक्टोबर दरम्यान जागतिक वृद्ध कुस्ती स्पर्धा सुरू आहेत.जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने सदर जागतिक कुस्ती स्पर्धा वृद्धांसाठी होत आहे ज्यात 35 वयाच्या पुढिल पैलवान भाग घेऊ शकतात.फ्रीस्टाईल आणि ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात सदर जागतिक कुस्ती स्पर्धा होत आहे.यामध्ये प्रत्येक देशातील कुस्ती फेडरेशन वजनी गटानुसार नावे पाठवतात.नावे पाठवण्याचा हक्क व निकष त्या त्या देशातील फेडरेशन ठरवत असते.
सदर स्पर्धेत अजून तरी महिला कुस्ती नाही मात्र जागतिक कुस्ती संघटनेच्या पत्रकात महिला कुस्ती लवकर सामील करू असे म्हटले आहे.
सदर स्पर्धा त्यांना महत्वाची आहे ज्यांनी उमेदीच्या काळात कुस्तीमध्ये कामगिरी केली नाही मात्र कुस्तीची नाळ तुटू न देता त्यात आपले योगदान देत राहिले.
सदर स्पर्धेत शक्यतो कोचेस,पंच हे सामील होताना दिसून येत आहेत.
source : united world wrestling 

दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत सदर स्पर्धा बल्गेरिया मधील प्लोवदीव मध्ये सुरू राहील.

धन्यवाद
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form