मोगरी (करेल) फिरवण्याच्या स्पर्धेत कोल्हापूरचे वस्ताद जयवंतराव पाटील यांचा प्रथम क्रमांक : पाच मिनिटात 215 वेळा करेल फिरवली
कुस्ती मल्लविद्या वाळवा तालुकाध्यक्ष, शाही थंडाई चे संस्थापक, महाबली केसरी पैलवान संग्रामसिंह जाधव यांच्या "शाही थंडाई" वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य थंडाई महोत्सव व करेल फिरवण्याच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या बजरंग आखाड्याचे वस्ताद जयवंतराव पाटील यांनी पाच मिनिटात 215 वेळा 20 किलो ची मोगरी करेल फिरवून प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत त्यांची पत्नी,आंतरराष्ट्रीय धावपट्टू अनिता पाटील यांनीही सहभाग नोंदवला होता.
तरुणाईला बलाची उपासना शिकवणारे जयवंतराव पाटील हे उचगाव कोल्हापूर येथे बजरंग आखाडा चालवतात.कुस्ती मल्लविद्या महासंघाचे ते करवीर तालुका सरचिटणीस आहेत.
त्यांच्या पत्नी अनिता पाटील या सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धावपट्टू आहेत.संग्राम माने यांनी स्थापन केलेल्या शाही थंडाई हाऊस च्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिर व विविध स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी करत असतात.यावर्षी करेल फिरवणे हा अभिनव उपक्रम त्यांनी आयोजित करुन समाजाला बलोपासनेचा संदेश दिला.
स्पर्धेसाठी तुझ्यात जीव रंगला मालिकेतील छोटा अभिनेता राजवीर उर्फ लाडू व याची विशेष उपस्थिती होती.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com
Tags
कुस्ती बातम्या