नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र कुस्ती संघाला 5 पदके
गांधीनगर गुजरात येथे नुकतेच संपन्न झालेल्या मानाच्या नॅशनल गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र कुस्ती संघाने चांगली कामगिरी केली.ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात कांस्य तर फ्रीस्टाईल मध्ये कांस्य व रौप्यपदकासह महिला कुस्तीत दोन कांस्यपदक जिंकले.
पदक तक्ता असा....
फ्रीस्टाईल
1) पैलवान नरसिंह यादव 74 किलो कांस्यपदक
2) पैलवान वेताळ शेळके 86 किलो रौप्यपदक
ग्रीकोरोमन
1) पैलवान समीर पाटील 77 किलो कांस्यपदक
महिला
1) पैलवान स्वाती शिंदे 53 किलो कांस्यपदक
2) पैलवान सोनाली मंडलीक 57 किलो कांस्यपदक
कोच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार,पैलवान संदीप पटारे,NIS कोच दत्ता माने, NIS मंगेश डोंगरे, NIS कोच दादासाहेब लवटे, NIS कोच माधुरी घराळ यांनी काम पाहिली.
सदर स्पर्धेसाठी अर्जुनवीर काकासाहेब पवार,महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव मा.श्री. नामदेव शिरगावकर,उपाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब लांडगे, मा.श्री. विजय काका बराटे,शासकीय कुस्ती कोच मा.श्री.शिवाजी कोळी हिंदकेसरी मा.श्री.अमोल बराटे,रुस्तुम ए हिंद अमोल बुचडे,मा.श्री.मोहसीन बागवान मा.श्री. संजय शेटे यांनी स्वतः उपस्थित राहून संघाचे मनोधैर्य उंचावले.
सर्व कुस्तीगीरांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.com