हसन याझदानी इराण विरुद्ध डेव्हिड टेलर अमेरिका : 5 वर्षांची चित्तथरारक चुरस : 5 वर्ष जागतिक कुस्तीतील अंतिम सामन्याची प्रेरणादायी कथा

हसन याझदानी इराण विरुद्ध डेव्हिड टेलर अमेरिका :  5 वर्षांची चित्तथरारक चुरस : 5 वर्ष जागतिक कुस्तीतील अंतिम सामन्याची प्रेरणादायी कथा

लेखन
पै.गणेश मानुगडे

जागतिक कुस्ती स्पर्धा ही प्रतिवर्षी होणारी मानाची कुस्ती स्पर्धा. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे म्हणजे त्या देशाची मान जागतिक स्तरावर उंचावणे होय.युनायटेड वर्ल्ड रेसीलिंग या जागतिक कुस्ती संघटनेअंतर्गत अव्याहतपणे जगभरात विविध कुस्ती स्पर्धेचे आयोजन होत असते.कुस्ती क्षेत्रासाठी ऑलिंपिक, एशियन, जागतिक आणि राष्ट्रकुल यासारख्या अत्यंत महत्वाच्या स्पर्धा असतात.यापैकी सिनियर  जागतिक कुस्ती स्पर्धा या स्पर्धा म्हणजे खेळाडूंच्या अंगीभूत प्रतिभेची जणू परीक्षा असते.
याच स्पर्धेतील एक अतिशय स्फूर्तीप्रेरणादायी कुस्ती म्हणजे 86 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात 2018 पासून आजपर्यंत फायनल ला येणारी कुस्ती होय.इराण चा युवा मल्ल हसन याझदानी विरुद्ध अमेरिकेचा पैलवान डेव्हिड टेलर.
2017 पर्यंत डेव्हिड आणि हसन इतर मानाच्या स्पर्धा जिंकत जिंकत जोड तोडत वर आले.2018 साली बुडापेस्ट हंगेरी ला झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात ही क्वालिफाय राउंड साठी लढत झाली.यामध्ये डेव्हिड टेलर ने हसन वर लीलया विजय मिळवला.अतिशय चुरशीच्या कुस्तीत दोघेही मल्ल एका गुणसाठी प्राणपणाने लढत होते.माझ्या मते तर हीच कुस्ती या वजनी गटात सुवर्णपदक कोण जिंकणार ही ठरवणारी कुस्ती होते.पुढे डेव्हिड ने तुर्कीच्या मल्लावर विजय मिळवत 2018 बुडापेस्ट जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले.

कुस्ती पहा.


2019 मध्ये नूर सुलतान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत मात्र हसन याझदानी आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी कसून तयारी करुन आला होता.मात्र यावर्षी डेव्हिड टेलर खेळलाच नाही.अमेरिकेच्या आंतरिक कलहात जॉर्डन बरोज आणि डेव्हिड मध्ये 86 किलो फ्रीस्टाईल गटात आंतरिक कलह झाला असावे असे समजते.मात्र यावर्षी एक नवा चेहरा फायनल मध्ये पोहोचला तोही भारतीय.दीपक पुनिया याने 86 किलो वजनी गटात तुल्यबळ लढत जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.त्याची लढत अर्थातच इराणच्या हसन याझदानी विरुद्ध होती.याझदाणी यात विजेता ठरला व इराण साठी सुवर्णपदक जिंकले.

कुस्ती पहा.

2020 कोरोना महामारी मुळे टोकियो ऑलिंपिक विना प्रेक्षक झाले.यावर्षी सुद्धा 86 किलो वजनी गटात भिडले ते दोन महारथी म्हणजे डेव्हिड टेलर अमेरिका विरुद्ध हसन याझदानी.
गत वर्षी जागतिक स्पर्धेत सहभागी  न झालेला डेव्हिड यावर्षी जणू जिंकायचा इर्षेने सहभागी झाला होता.फायनल ला हसन सुद्धा तितक्याच जिद्दीने उतरला होता.मात्र डेव्हिड ने जीवाची बाजी लावत हसन वर विजय मिळवत अमेरिकेला ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.

कुस्ती पहा.

2021 सालची जागतिक कुस्ती स्पर्धा भरली नॉर्वे देशातील ओस्लो शहरात.86 किलो वजनी गटात तुल्यबळ लढती जिंकत अंतिम सामन्यात पुन्हा चौथ्या वर्षीही तेच महावीर आमनेसामने आले.डेव्हिड टेलर अमेरिका आणि हसन याझदानी इराण.

या सामन्यात डेव्हिड काहीसा कमकुवत वाटला.आधल्या वर्षीच्या ऑलिंपिक गोल्ड मेडल मुळे सरावात खंड असावा किंवा अन्य कारण.मात्र अवघ्या 2-6 गुणांनी डेव्हिड ला हसन ने पराभूत केले आणि गेल्या चार वर्षाच्या पराभवाचे उट्टे काढून जागतिक कुस्ती स्पर्धेत इराण ला सुवर्णपदक जिंकून दिले.

कुस्ती पहा:


2022 साल म्हणजे नुकतेच सरबिया येथील बेलग्रेड येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सलग पाचव्यांदा हसन

याझदानी 86 किलो वजन गटात अंतिम फेरीत पोहोचला. गत वर्षीच्या पराभवाने खचून जाता पुन्हा रात्रीचा दिवस घाम गाळ गाळून डेव्हिड टेलर सुद्धा अंतिम सामन्यात पोहोचला. मंडळी यावर्षी मात्र डेव्हिड ने हसन चा  7-1 असा एकतर्फी पराभव करत देशासाठी 3 रे आणि पदकात दुसरे सुवर्णपदक जिंकले.

कुस्ती पहा:

यावरुन एक समजून घेता येते की जागतिक कुस्ती सारख्या मानाच्या स्पर्धेत 2018 पासून प्रत्येक वर्षी अंतिम सामन्यात येणारे डेव्हिड आणि हसन यांच्यात होणारी सुवर्णपदकाची लढत ही खऱ्या अर्थाने चुरशीची व ऐतिहासिक लढत म्हणावी लागेल.अश्या स्पर्धेत भारताचा दीपक पुनिया अंतिम फेरीत जातो ही भारतीयाच्या दृष्टीने देखील अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्रातील मल्ल अश्या स्पर्धेत गेले पाहिजेत यासाठी दीर्घ सराव,सुविधा यांची गरज आहे.राहुल आवारे याने याच स्पर्धेत धडक मारुन कांस्यपदक जिंकले आहे.मातीतल्या कुस्तीत बलाढ्य असणारा महाराष्ट्र जागतिक स्पर्धेत बलाढ्य ठरणार यात शंका नाही.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form