जवळपास पराभूत झाला असताना,अशक्य ते शक्य केल ते नरसिंह यादव ने ढाक लावून
2015 सालची वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धा अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर "लास वेगास" येथे आयोजित केली होती.
पै.नरसिंग पंचम यादव (जन्म ६ ऑगस्ट, इ.स. १९८९:उत्तर प्रदेश, भारत,मुंबईचा रहिवासी)हा भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने २००८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवल्यामुळे त्याची महाराष्ट्र पोलीसमध्ये थेट पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जगमल सिंग हे त्याचे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई सेंटरमधील प्रशिक्षक आहेत. २०१२ लंडन ऑलिंपिकसाठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ७४ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली होती.असा मल्ल 74 किलो वजनी गटात या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत होता.
लास व्हेगसमध्ये 2015 च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्पर्धेत, पै.नरसिंह यादवने इस्राईलच्या पै.हनोख रचमीनवर पहिल्या फेरीत 3:1 गुनाणी जिंकले. त्याचा पुढील विरोधक तुर्कीचा सुनीर डेमिटस होता ज्यात त्याने 3:1 असा विजय मिळवला. तिसऱया फेरीत नरसिंगने क्यूबाच्या लिव्हन लोपेज आस्कुय याच्यावर 4-0 अशी आघाडी मिळविली. चौथ्या फेरीत मंगोलियाच्या उनर्भाट पुर्वज्जकडून 3-1 गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.
त्याला कांस्यपदक मिळवून देण्याची संधी मिळाली आणि फ्रान्सच्या झेलमखान खडजईव्हवर यांच्याबरोबर 12 सप्टेंबर 2015 रोजी कुस्ती झाली.
सुरवातीपासून फ्रान्सच्या मल्लाने आक्रमक पवित्रा राखत नरसिंह ला गुणांनी मागे टाकले व 5 मिनिट 20 सेकंद पर्यंत 12-4 असा गुण फरक होता.
उरलेल्या 40 सेकंदात 9 गुणांची आघाडी मिळवणे केवळ अशक्य होते.पाहणाऱ्यांना ही कुस्ती नक्की नरसिंह पराभूत होणार असे वाटले होते.मात्र नरसिंह शरीराने वेगवान असला तरी मनाने पूर्णपणे शांत होता.
मातीत सराव करताना क्षणात विजय मिळवून देणारा "ढाक" हा डाव त्याने 5 मिनिट 25 व्या सेकंदाला मारला आणि पुढच्या अवघ्या 8 सेकंदात त्याने फ्रान्सच्या मल्लाला अक्षरशः चारी मुंड्या चितपट केले.
बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडणार्या या कुस्तीमुळे नरसिंह ला कांस्यपदक मिळाले आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्याचे डायरेक्ट तिकीट मिळाले.
जगातील 6 टॉप मल्लामध्ये त्याचे नाव जागतिक कुस्ती संघटनेने नोंद केले.मात्र 2016 साल उजडल्यानंतर जे काही घडले ते आपण सर्व जाणता.
नरसिंह ची ही अजरामर कुस्ती अगदी विवेचनासह जरूर पहा कुस्ती-मल्लविद्या youtube चॅनेल वर खालील लिंक द्वारे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या
Tags
प्रेरणात्मक लेख