जगातल्या सगळ्या पैलवानांचा कान कसा फुटतो?

जगातल्या सगळ्या पैलवानांचा कान कसा फुटतो?

बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो कि पैलवानांचा कान कसा फुटतो.?
काही जण म्हणतात कि कानात सुपारी घालून ती सुपारी हाताच्या बुक्कीने फोडतात. 
तर हे बिलकुल चुकीचे आहे.कान फुटतात कारण रोजच्या सरावावेळी प्रतिस्पर्ध्याच्या हाताचे ठोके कानावर पडून कान मऊ होतो,हे ठोके अधिकच जास्त पडू लागले तर कान फुटतो.फुटतो म्हणजे म्हणजे त्यामध्ये रक्त साकळून फुग येते.अश्या वेळी बर्फाने किंवा भाकरी गरम करून त्याच्या गरम वाफेने ते शेकले जाते.कान कपड्याने बांधून ठेवला जातो आणि २-४ दिवसात फुग ओसरते.
फुटलेला कान अतिशय कठीण बनतो. 
अलंकारिक भाषेत कान फुटले कि कुस्तीचे उघडे सर्टीफिकेट मिळाले असे म्हणतात. 
खर तर फुटलेला कान पाहिलेला पैलवान पहिला कि महाराष्ट्रात कुठेही ओळख असुदे अथवा नसुदे खूप इज्जत देतात लोक. 
कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी म्हणतात की 

"डॉक्टरांना सांगावे लागते, मी डॉक्टर आहे,
इंजिनियरना सांगावे लागते की,मी इंजिनियर,
पण पैलवानाला सांगावे लागत नाही की पैलवान आहे...त्याच्या कानावर असलेलं उघड सर्टिफिकेट सर्व काही सांगून जाते"

जगातील सर्व पैलवान यांचे असे कान फुगलेले असतात.एकप्रकारे कुस्तीत करियर करणाऱ्या विविध देशातील मल्लांची वैश्विक एकी दिसून येते.जात पात पंथ भेद नष्ट करुन कुस्तीत असणारी ही सामूहिक एकी शांतीचा उपदेश देत असते.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya. com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form