ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.पार्थ कंधारे याचे कांस्यपदक

 ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.पार्थ कंधारे याचे कांस्यपदक
दिनांक 29 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान आयोध्या( गोंडा नंदिनीनगर) येथे सुरू असणाऱ्या अखिल भारतीय ग्रँड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान पार्थ शंकर कंधारे याने 63 किलो ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे.
सेमी फायनलच्या कुस्तीत उत्तर प्रदेशच्या पै.निखिल याच्याकडून 6/6 अशी समांतर गुण संख्या असताना शेवटच्या पॉईंट निखिलने घेतल्यामुळे पै.पार्थ निसटता पराभव झाला
ब्रांझ पदकाच्या लढतील दिल्लीच्या पै. तरुण याच्यावर पै. पार्थने 8/0 अशी एकतर्फी लढत करीत ब्रांझ पदक पटकवले.
पार्थचे या सीजन मधील नॅशनल स्पर्धेतील हे तिसरे मेडल आहे.

पहिले पदक रँकिंग नॅशनल स्पर्धा ब्रांझ

दुसरे पदक फेडरेशन कप नॅशनल कुस्ती स्पर्धा सुवर्णपदक

तिसरे पदक ग्रैंड प्रिक्स नॅशनल कुस्ती स्पर्धा.
पार्थ हा गुरुकुल कुस्ती संकुल सोमटने पुणे येथे वस्ताद शंकर भाऊ कंधारे,वस्ताद खंडु वाळुंज व कुस्ती कोच शिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो
पार्थच्या यशाबद्दल आमदार महेश दादा लांडगे व कुस्ती महर्षी अण्णासाहेब पठारे यांनी पार्थचे अभिनंदन केले

पार्थचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form