कुस्ती क्षेत्रात करियर करणाऱ्या,इच्छा असणाऱ्या पैलवान ,पालक यांना महत्वाच्या टिप्स
➡️शास्त्रोक्त कुस्ती शिकली पाहिजे.
➡️उत्तेजक द्रव्यांपासून दूर राहिले पाहिजे.
➡️नित्यनेमाने कुस्ती मेहनत केली पाहिजे.
➡️योग्य खुराक घेतला पाहिजे.
➡️विनम्र राहिले पाहिजे.
➡️आंतरराष्ट्रीय कुस्तीबद्धल सतत माहिती घेतली पाहिजे.
➡️आपल्या वजनगट व गटातील प्रतिस्पर्धी यांचा अभ्यास केला पाहिजे.
➡️कुस्तीतील सर्वात उच्च ध्येय ठरवले पाहिजे.
➡️गुरुंचा आजन्म मान ठेवला पाहिजे.
➡️सोशल मीडिया व इंटरनेट चा वापर केवळ ज्ञान आत्मसात करण्यासाठी केले पाहिजे.
➡️तयारी व सराव यावर विश्वास ठेवला पाहिजे.
➡️मोठे युद्ध जिंकण्यासाठी कधी कधी छोट्या मोठ्या लढाया हरल्या तरी चालतात याची खात्री बाळगली पाहिजे.
➡️आधुनिक कुस्ती व आपण याची तुलना झाली पाहिजे.
➡️आपला वार्षिक,पंचवार्षिक व अंतिम ध्येय याचा प्लॅन आजच तयार पाहिजे.
➡️स्पर्धेवर भर दिला पाहिजे.
➡️दुखापतीमुळे कुस्ती सोडू नये,बरे करुन पुन्हा श्रीगणेश केला पाहिजे.
➡️तालीम हेच घर समजून सातत्य राखा.
जरूर share करा.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com
आपल्या मुलांना जर शाळे सोबतच कुस्ती ची शिकवण द्यायची असेल तर कोणत्या वयवर्षे असताना तालीम किंवा कोणत्या अकॅडमी मध्ये वगैरे घातले पाहिजे जेने करून शाळा आणि कुस्ती दोन्ही चा योग्य असा समतोल साधता येईल कृपया जाणकार वस्ताद नी मार्गदर्शन करावे मनापासून विनंती 🙏
ReplyDeleteतालमीचे वय ८ पासुन घातले पाहिजे तालीम सांगू शकत नाही वस्ताद हा अवघड प्रकार आहे पैlavan तयार करण्यात फार मोठा अन्याय केला जातो
ReplyDelete