हिवाळी कुस्ती प्रशिक्षण शिबीर - वय मर्यादा १० ते १९ वर्षे - सविस्तर वाचा.

|| कुस्ती अन् देशभक्ती ||

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ

मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी ता.शिराळा जि.सांगली

हिवाळी कुस्ती प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर २०२२ 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शिबिराचा कालावधी दि.२१ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२२
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नमस्कार , 
       महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ या कुस्तीसाठी निस्वार्थपणे अहोराञ कार्य करणा-या संघटनेत काम करत असताना देसभक्त , निर्व्यसनी ,बलदंड पिढी घडविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील मल्लांना आधुनिक कुस्ती प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही मल्लविद्या कुस्ती केंद्राची स्थापना केली आहे.कुस्ती क्षेञाला उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लहान वयात मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने आम्ही हिवाळी कुस्ती प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करत आहोत याची सर्व कुस्तीगीर , पालक , वस्ताद व कुस्तीप्रेमी यांनी नोंद घ्यावी...धन्यवाद....! 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शिबिरातील प्रमुख क्रिडा प्रकार :-

कुस्ती - फ्रि स्टाईल - ग्रोको रोमन (माती व मॅट) , धावणे , व्हाॅलीबाॅल , पासिंग बाॅल , योगासन , गोळाफेक , लांब उडी , उंच उडी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
प्रवेश फी :- ६०००/- रुपये माञ (२१ दिवस)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शिबिराची वैशिष्ट्ये :-

:- तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन 
:- आधुनिक मॅट व प्रशस्त मातीचा आखाडा
:- खेळासंबंधी व्यायाम व आहार विषयी सखोल मार्गदर्शन 
:- योगासन प्रात्यक्षिके 
:- आंतरराष्ट्रीय नियमानुसार कुस्ती प्रशिक्षण 
:- व्हिडिओद्वारे कुस्तीच्या डावाचे मार्गदर्शक 
:- प्रशिक्षणा दरम्यान स्पोर्टस किट दिले जाईल.
:- शिबिर पुर्ण करणा-या खेळाडूला प्रमाणपञ व शिल्ड दिले जाईल.

शिबिराचे नियम व अटी :-

:- वय मर्यादा १० ते १९ वर्षे 
:- प्रशिक्षणा दरम्यान मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे.
:- एकदा घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नाही.
:- कोणत्याही कारणास्तव फी परत दिली जाणार नाही.
:- प्रवेश निश्चितीवेळी फी भरणे आवश्यक
:- प्रवेश नोंदणी अंतिम तारीख - २० आॅक्टोबर २०२२

महत्वाच्या सुचना :-

:- स्वत:च्या जबाबदारीवर शिबिरात सहभागी होणे 
:- शिबिरासाठी येताना अंथरुन - पांघरुन , ताट - वाटी , ग्लास घेऊन येणे 
:- प्रत्येकाचे शुज , स्पोर्टस किट असणे आवश्यक आहे
:- शिबिरासाठी जागा मर्यादित असल्याने लवकरच प्रवेश निश्चित करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••
प्रमुख मार्गदर्शक :-

आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा) 
पै.गणेशजी मानुगडे (भाऊ)
मा.आनंदराव पाटील (मिस्ञी)
पै.सुरेश जाधव (कुस्ती निवेदक)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
विशेष सहकार्य :-

पै.आनंदराव मुळीक (भाऊ) युवा उद्योजक 
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
कुस्ती कोच :-

पै.उत्तम घोलप (महाराष्ट्र चॅम्पियन) 
पै.उत्तम जाधव - पाटील (दादा)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संपर्क :- 7083539595/8600636124
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्थळ :- मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी ता.शिराळा जि.सांगली

शिबिर प्रमुख :- 
पै.राहुल नारायण जाधव 
(उपाध्यक्ष , कुस्ती मल्लविद्या महासंघ) 
पै.राकेश नारायण जाधव
 (कमांडो) 

👍आयोजक :-
 महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ
https://www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form