गेली दोन दिवस हा लहान पैलवान याच्या वेगवेगळ्या व्यायाम प्रकाराच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.
या छोट्या पैलवानाचे नाव निखिल माने आहे.
वय वर्ष अवघे 7 वर्ष , एवढ्या कमी वयात सुद्धा भल्याभल्या मुलांना लाजवेल असा व्यायाम प्रकार हा या लहान वयात करतो.
एकदा आवड निर्माण केली की तो स्वतःहून त्या ठिकाणी रोज जाईल त्याला व्यायाम करायची सवय लागेल,आणि या अर्थाने आपली युवा पिढी मनान, बुद्धीन, मनगटांन सशक्त होईल समृद्ध होईल. तालमीत त्याला चांगली संगत मिळाल्यामुळे ,चांगले मित्र मिळाल्यामुळे, चांगल्या वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्यामुळे नक्कीच त्याचा भविष्यकाळ उज्वल होईल.
आपली महाराष्ट्राची संस्कृती असलेला कुस्ती या खेळाचे जतन संवर्धन होईल.
धन्यवाद..



पैलवान संग्राम कांबळे 

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ

Tags
प्रेरणात्मक लेख