सातारा महाराष्ट्र केसरी 2021 सहभागी मल्लांचे सर्टिफिकेट मिळावे - वस्ताद नामदेव बडरे यांची मागणी

सातारा महाराष्ट्र केसरी 2021 सहभागी मल्लांचे सर्टिफिकेट मिळावे - वस्ताद नामदेव बडरे यांची मागणी

पोलीस भरतीसह नोकरी साठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र लवकर देण्यात यावे.

सातारा येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील सहभागी पैलवानांचे सहभाग सर्टिफिकेट आद्याप मिळाले नाही.महाराष्ट्र पोलीस भरती निघाली आहे तरी सर्व सर्टिफिकेट मिळाली तर बरं होईल,कारण पैलवानांना त्यांचे व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे यांनी केली आहे.
सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2021 सहभागी मल्लांचे प्रमाणपत्र शाळा,कॉलेज यासह नोकरीसाठी आवश्यक असल्याने ते लवकर मिळावे अशी मागणी होत आहे.
वस्ताद नामदेव बडरे हे आटपाडी जि.सांगली येथे "जय हनुमान कुस्ती केंद्र" नावाने कुस्ती संकुल चालवतात.भारतीय रेल्वे कुस्ती संघाचे ते सहायक मार्गदर्शक असून महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान आहेत.

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form