महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस भारतीय कुस्ती महासंघाची कारणे दाखवा नोटीस ... चौकशी पुर्ण होई पर्यंत महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धा अस्थाई समितीच्या हाती....पै.संदीप भोंडवे

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस भारतीय कुस्ती महासंघाची कारणे दाखवा नोटीस ... चौकशी पुर्ण होई पर्यंत महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धा अस्थाई समितीच्या हाती....पै.संदीप भोंडवे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात संलग्न 30 ते 32 शहर /  जिल्हा कुस्तीगीर संघाने भारतीय कुस्ती महासंघास तक्रार केल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने  दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदास कारणे दाखवा नोटीस बजावली होती व सदर नोटीसला उत्तर देण्यास 10 दिवसाची मुदत दीली होती ... सदर  चौकशी पुर्ण होई पर्यंत महाराष्ट्र राज्य मध्ये कुस्ती स्पर्धा घेणे , महाराष्ट्र कुस्ती संघाची  निवड चाचणी घेऊन संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविणे इ. कामे अस्थाई समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे ..

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस काढलेल्या परीपत्रकाचा मराठी अनुवाद खालील प्रमाणे...

                          परिपत्र
आपल्या सर्वांना माहीत आहे की , भारतीय कुस्ती महासंघाने बाळासाहेब लांडगे यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करुन श्री संजय सिंह यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी अस्थाई समितीची स्थापना केलेली होती . मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या रिट याचिका नंबर 12237/2022 मध्ये दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी निकाल देत असताना  अनुक्रमांक XXVI  अनुसार भारतीय कुस्ती महासंघाने दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे .... कारणे दाखवा नोटीसच्या माध्यमातून बाळासाहेब लांडगे यांची चौकशी चालु असुन जो पर्यंत चौकशी पुर्ण होत नाही तो पर्यंत श्री संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली कमिटी महाराष्ट्रामध्ये कुस्तीचे काम पाहील ...
   आम्हास असे समजले आहे की , बाळासाहेब लांडगे हे महाराष्ट्रामध्ये राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा भरविण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सदर स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाची परवानगी नसुन श्री संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अस्थाई समितीस सर्व प्रकारच्या राज्य अजिंक्यपद घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
  तथापी आपणास कळविण्यात येते की , बाळासाहेब लांडगे यांच्या वतीने भरविण्यात येणा-या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये कोणी सहभागी होऊ नये. जर कोणी अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तर भारतीय कुस्ती महासंघ त्यावर कारवाई करेल. 
कळावे आपला
वी.एन.प्रसुद 
( महासचिव )

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form