भारतीय सेना कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे पैलवान पृथ्वीराज पाटील चे सुवर्णपदक तर पैलवान सोनबा गोंगाने चे रौप्यपदक

भारतीय सेना कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे पैलवान पृथ्वीराज पाटील चे सुवर्णपदक तर पैलवान सोनबा गोंगाने चे रौप्यपदक

71 व्या भारतीय सेना अंतर्गत कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज पाटील याने सुवर्णपदक मिळवले तर पैलवान सोनबा गोंगाने याने रौप्यपदकाची कमाई केली.
पैलवान पृथ्वीराज पाटील याने 92 किलो फ्रीस्टाईल प्रकारात ही कामगिरी केली.पृथ्वीराज चे सर्व्हिसेस मधील हे दुसरे सुवर्णपदक आहे.
पैलवान पृथ्वीराज पाटील हा आशियायी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक विजेता आहे.महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे.त्याच्या कुस्ती कारकिर्दीचा गौरव म्हणून भारतीय सेनेने त्याला मानाची नोकरी दिली.

पैलवान सोनबा गोंगाने याची ही सहावी सर्व्हिसेस स्पर्धा होती.त्याने 65 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.
दोघेही 23 मराठा युनिट मध्ये कार्यरत असून त्यांना कुस्ती कोच विनायक दळवी सर,राम पवार सर व अमर निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पैलवान पृथ्वीराज पाटील व पैलवान सोनबा गोंगाने यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form