ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान पार्किंगचा अड्डा बनवणाऱ्याच्या विरोधात कुस्ती-मल्लविद्या महासंघाची उग्र निदर्शने
राजर्षी शाहू ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूरत काही महाभागांनी गाड्या पार्किंग केल्याची बातमी कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम सिंह कांबळे यांनी फोनवर जशी कळवली तसेच डोक्यात संतापाची आग उठली.
संग्रामसिंह कांबळे यांनी यावर व्यापक प्रतिक्रिया देत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाची अशी विटंबना होऊ नये यासाठी कुस्ती-मल्लविद्या महासंघ कोल्हापूर जिल्हा मार्फत उग्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी आदरणीय बाबाराजे महाडिक, जयवंतराव पाटील वस्ताद ,दत्तात्रय ठाणेकर सर, जयराज कोळी ,आशुतोष शिंदे, रणजीत कांबळे ,पैलवान अमर पाटील यांनी सदर आंदोलन यशस्वी केले.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com
Tags
कुस्ती बातम्या