राजर्षी खासबाग कुस्ती मैदान बनले कार पार्किंगचा अड्डा - कुस्तीप्रेमीतून संतापाची लाट

राजर्षी खासबाग कुस्ती मैदान बनले कार पार्किंगचा अड्डा - कुस्तीप्रेमीतून संतापाची लाट


राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर येथे लगतच असणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहात राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेसाठी आलेल्या कलाकार पाहुणे व प्रेक्षकांनी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था थेट खासबाग कुस्ती मैदानात केल्याचे फोटो वाऱ्यासारखे सर्वत्र व्हायरल झाले. सदर बाबीचा तीव्र संताप सोशल मीडिया व अन्य प्रसार माध्यमाद्वारे होत आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी 1912 साली रोमच्या युद्ध मैदानाच्या तोडीचे कुस्ती मैदान कोल्हापुरात उभे केले. या मैदानात आजतागायत अनेक ऐतिहासिक लढती झालेल्या आहेत. कोरोना वैश्विक महामारीच्या काळात या कुस्ती मैदानात बेफाम गवत वाढले असताना कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या द्वारे सदर मैदानाची स्वच्छता सुद्धा करण्यात आली होती. 
आता सदर मैदानाची विटंबना थेट नाट्य स्पर्धेचे आयोजक प्रेक्षक व त्यांना परवानगी देणाऱ्या महाभागाद्वारे होत आहे. 
सदर घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभरातील कुस्ती प्रेमींच्याद्वारे होत आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाद्वारे सदर घटनेचा निषेध करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आज सायंकाळी कसबा कुस्ती मैदानात या संदर्भात प्रतिकात्मक आंदोलनाची हाक कुस्ती-मल्लविद्या महासंघाने दिली आहे.

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form