भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी पी.टी. उषा यांची बिनविरोध निवड

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी पी.टी. उषा यांची बिनविरोध निवड
पिलूवालकंडी टेकापरिवल उषा (पिलावुळ्ळकण्टि तेक्केपरम्पिल् उषा)अर्थात पी.टी. उषा.इयत्ता आठवी ला पी.टी. उषा चे पूर्ण नाव काय हा प्रश्न संभाव्य होता म्हणून आम्ही सर्वांनीच तोंडपाठ केले होते हे नाव.आजच बातमी समजली की याच भारतीय ऑलिंपिक संघाच्या अध्यक्षा झाल्या.वेगवान धावपट्टू असणाऱ्या पी.टी. उषा आज जिवंतपणीच आख्यायिका बनल्या इतके रेकॉर्ड्स आजमितीला त्यांच्या नावावर आहेत.महिला खेळाडूंना प्रेरणेचा अखंड स्त्रोत त्यांनी निर्माण केला.मेहनत,कष्ट,जिद्द याच्या जोरावर  या भारताच्या लेकीने धावणे क्रीडा प्रकारात आकाशाला गवसणी घातली.

पी. टी. उषा यांनी ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत इतिहास रचला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) ९५ वर्षांच्या इतिहासात पी. टी. उषा या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या आहेत. याशिवाय उषा आयओए प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू असतील. उषा सध्या राज्यसभेच्या खासदारही आहेत.

उषा यांनी आयओएच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दाखल केला आहे. एम. सी. मेरी कोम यांच्या नेतृत्वाखालील आयओएच्या कमिशनणे निवडलेल्या आठ ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ आऊटस्टँडिंग मेरिट’मध्ये उषा यांचा समावेश आहे. अनेक आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या ५८ वर्षीय उषा यांनी आयओए अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form