वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लाची तुफानी कामगिरी - 12 पदकांची कमाई

वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लाची तुफानी कामगिरी - 12 पदकांची कमाई

आंध्रप्रदेश विशाखापट्टनम येथे झालेल्या वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लानी तब्बल 12 पदके मिळवली.
मातीत बेमुदत निकाली कुस्तीत वरचढ असणारा महाराष्ट्र स्पर्धात्मक कुस्तीत गेल्या दशकांपूर्वी खूपच मागे होता.मात्र या स्पर्धांची किंमत आणि मिळणारे फायदे याची जाणीव हळूहळू होत गेल्याने आणि कुस्ती क्षेत्रात करियर करणाऱ्या प्रत्येक मल्लाने "ऑलिंपिक" हेच अंतिम ध्येय आहे याची उशिरा का होईना जाणीव झाल्याने आजमितीला महाराष्ट्रातील अनेक तालीम चालक,मालक,कोच,पालक आपल्या मुलांना जास्तीत जास्त स्पर्धा खेळवू लागले आहेत ही बाब समाधानकारक आहे.याचेच एकूण फळ म्हणजे यावर्षीचा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील 12 पदकांचा चढता आलेख होय.
फ्रीस्टाईल,ग्रीकोरोमन व महिला कुस्तीत पदक मिळवलेले मल्ल पुढीलप्रमाणे...

फ्रीस्टाईल👇🏻 
1) पै.पृथ्वीराज पाटील - सुवर्णपदक,
2) पै. राहुल आवारे  - रौप्यपदक,
3) पै.नरसिंग यादव - रौप्यपदक,
4) पै.उत्कर्ष काळे- रौप्यपदक, 
5) पै.सुरज कोकाटे - कास्यपदक , 
6) पै. आतिष तोडकर - कास्यपदक 
ग्रिकोरोमन👇🏻
1) विक्रम कुराडे - रौप्यपदक 
2) विनायक पाटिल -  कास्यपदक
3) समिर पाटिल -  कास्यपदक
4) शैलेश शेळके - कास्यपदक
5) तुषार डुबे - कास्यपदक

महीला👇🏻
6) नेहा चौगुले - 50 किलो - कास्यपदक

सर्व पदक प्राप्त मल्ल,त्यांचे वस्ताद-कोचेस व पालक यांचे महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form