सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे च्या मल्लांची गरूडभरारी

सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे च्या मल्लांची गरूडभरारी
आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टनम येथे झालेल्या "सिनियर नॅशनल" कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या मल्लानी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
2 रौप्य व 3 कांस्यपदक अशी एकूण 5 पदके या तालमीतील मल्लानी मिळवून इतिहास रचला आहे.
सिनियर नॅशनल ही भारताच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धा होय.या स्पर्धेनंतरच आंतरराष्ट्रीय कुस्तीचे दरवाजे पैलवानांसाठी खुले होतात.मानाच्या अनेक स्पर्धेत पात्रता ठरवणारी ही स्पर्धा होय.या स्पर्धेत सहभागी होऊन पदक मिळवणे म्हणजे नक्कीच सोपी गोष्ट नाही.
अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी स्वतः अनेक आंतरराष्ट्रीय पदके मिळवली व आपले आयुष्य कुस्तीसाठी वाहून घेत अनेक मोठे पैलवान निर्माण केले.
यावर्षी विशाखापट्टनम येथे झालेल्या सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील मल्लानी मिळवलेली पदके पुढीलप्रमाणे...

अर्जुनवीर पैलवान राहुल आवारे यांनी 61 किलो फ्रीस्टाईल कुस्ती मध्ये रौप्यपदक मिळवत महाराष्ट्रातील मल्लांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.महाराष्ट्र पोलीस दलात Dysp असणारे राहुल आवारे यांचे सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेतील हे 8वे पदक होते.राहुल आवारे यांनी या पदकासह कुस्ती क्षेत्रात यशस्वी कमबॅक केले आहे.कुस्ती क्षेत्रात उच्च विचारसरणी ठेवत सातत्य आणि परिश्रम हे दोन मंत्र जपत पैलवान राहुल आवारे यांनी हे यश मिळवले.
पै.विक्रम कुऱ्हाडे याने 63 किलो ग्रीकोरोमन कुस्ती रौप्यपदक मिळवले. कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र असणारा विक्रम ग्रीकोरोमन कुस्तीप्रकारात अनेकदा आंतरराष्ट्रीय पदके मिळवणारा मल्ल आहे.भारतीय रेल्वेत सेवा करणारा विक्रम चालू वर्षीचा सिनियर नॅशनल मधील 63 किलो वजनी गटातील रौप्यपदक विजेता ठरला आहे.
पैलवान सुरज उर्फ नामदेव कोकाटे याने 61 किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले.सुरज बारामती तालुक्यातील सराटी चा सुपुत्र असून भारतीय रेल्वेत सेवा करतो.
पैलवान शैलेश शेळके याने 97 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले आहे.शैलेश लातूर जिल्ह्याचा सुपुत्र असून भारतीय सेनादलात सेवा करतो.
पैलवान तुषार दुबे याने 130 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. तुषार पुणे जिल्ह्याचा सुपुत्र असून मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांचा मानधनधारक मल्ल आहे.
या सर्वांना वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचे मार्गदर्शन लाभले.महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एकाच तालमीतील मल्ल भारतातील क्रमांक एकच्या स्पर्धेत पदके जिंकतात ही असामान्य गोष्ट आहे.येणाऱ्या काळात यातीलच काही आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके आणून आपल्या देशाचे नाव उंच करतील अशी अपेक्षा आहे.


सर्व पदक प्राप्त मल्ल,त्यांचे वस्ताद,कोचेस आणि पालक यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

धन्यवाद
🙏🏼🙏🏼🙏🏼

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form