महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वादाचा तोडगा निघाला ?
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या महाराष्ट्राच्या कुस्तीच्या मातृसंस्थेचा गेली 8 महिने सुरू होता ज्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी कशा घडत गेल्या यावर आपण मागच्या विडिओ मध्ये विस्तृत चर्चा केली.
कालच महाराष्ट्राच्या आघाडीच्या प्रसार माध्यमाद्वारे बातमी जाहीर करण्यात आली की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्रजी पवार,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते,खजिनदार सुरेश पाटील आदी मंडळींनी राजीनामे दिले आणि त्याजागी नवीन कार्यकारणी जाहीर केली.या बातमीबाबत काल मी माहिती मिळवली तेव्हा समजले की सदर राजीनामे हे काल दिले नसून शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आपत्कालीन विशेष कार्यकारणी बैठकीत जी मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बारामती हॉस्टेल पुणे येथे झाली होती तिथे दिले गेले होते.
सदर बैठकीत काय काय मुद्दे हे मी आपणास सांगू इच्छितो.सदर बैठकीत झालेले निर्णय व दिलेले राजीनामे हे भारतीय कुस्ती संघाला उद्देशून आहेत त्यामुळे ते हिंदीत आहेत जे मी तुम्हाला वाचून दाखवतो....
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
आपातकालीन विशेष कार्यकारिणी बैठक के कार्यवृत्त
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद की आपातकालीन विशेष कार्यकारिणी बैठक शनिवार 26 नवंबर 2022 को दोपहर 2.30 बजे बारामती बॉयज हॉस्टल 38, गोखले नगर पुणे 411016 में महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद के अध्यक्ष श्री शरदराव गोविंदराव पवार की अध्यक्षता में हुई।
इस बैठक में निम्नलिखित मुद्दों पर विचार किया गया ।
इस बैठक में निम्नलिखित गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
1) श्री शरदराव गोविंदराव पवार
3. श्री बालासाहेब शंकरराव लांडगे
5. श्री संभाजी लहू वरुटे
7. श्री दयानंद रामचंदजी भक्त
9. श्री बंकर नंदलाल यादव
11. श्री मारुति अडकर
13. श्री भगत सिंह भुज सिंह गाड़ीवाले
15. श्री शाम देवीचंदजी काबुलीवाले
17. श्री सुभाष नामदेव घासे
19. श्री रामचंद्र त्र्यंबक जोशी
2. श्री नामदेवराव गणपति मोहिते
4. श्री सर्जेराव परबती शिंदे
6. श्री गणेश संतोषराव कोहले
श्री सुरेश गजानन पाटिल
10.
श्री भरत किसन मेकाले
12. श्री अमृत पांडुरंग भोसले
14. श्री संपत सालुखे
16.
श्री सुभाष रामचंद्र ढोने
18. श्री ललित बालासाहेब लांडगे
20. श्री विनायक कृष्णजी गाढवे
परिषद के कोषाध्यक्ष श्री सुरेश पाटिल ने कुस्तीगीर परिषद के उपाध्यक्ष श्री संभाजी वरुटे के प्रस्ताव का अनुमोदन किया कि कुस्तीगीर परिषद के अध्यक्ष श्री शरदराव पवार बैठक की अध्यक्षता स्वीकार
करें।
सर्वप्रथम दिवंगत हुए जाने-पहचाने पैलवान प्रशिक्षक को श्रद्धांजलि अर्पित की गई, जिसके बाद
बैठक का कार्य प्रारंभ होने के बाद निम्न प्रस्ताव पारित किए गए।
विषय नंबर 1 :- रविवार दिनांक 20.11. 2022 को मामासाहेब मोहोल कुस्ती संकुल कात्रज पुणे में आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद के कार्यकारणी बैठक के कार्यवृत्त को पढ़ना और बनाए रखना।
संकल्प - रविवार दिनांक 20.11. 2022 को मामासाहेब मोहोल कुस्ती संकुल कात्रज पुणे में
आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद के कार्यकारणी बैठक के कार्यवृत्त को पढ़ा गया और बैठक मे सर्वसम्मति से कार्यवृत्त को बनाए रखने की मंजूरी दी क्योंकि इसमें कोई संशोधन नहीं था।
संकेतक ,- श्री सुभाष नामदेव घासे
स्वीकृत - श्री बंकट नंदलाल यादव
"संकल्प सर्वसम्मति से पारित
यानंतर बाळासाहेब लांडगे यांची सही व परिषदेचा शिक्का आहे...
पण,आपल्याला महत्वाची असणारी बातमी दुसऱ्या पानावर आहे त्यात नेमके काय लिहले आहे हे मी सांगतो...
विषय संख्या 2. भारतीय कुस्ती महासंघ से प्राप्त कारण बताओ नोटिस एवं पिछले कुछ दिनों को
घटनाओं पर चर्चा कर उचित निर्णय लेना।
.
संकल्प:- परिषद के महासचिव श्री बालासाहेब लांडगे ने हाल ही में आये उच्च न्यायालय के फैसले
को पड़ा तथा हाल ही में आये भारतीय कुस्ती महासंघ के कारण बताओ नोटिस को भी सभागृह में
पेश किया। भारत सरकार खेल मंत्रालय और भारतीय कुश्ती महासंघ द्वारा अपने महाराष्ट्र राज्य में
लागू किए जाने वाले स्पोर्ट्स कोड के बारे मे विस्तृत चर्चा सभागृह में हुवी
परिषद के अध्यक्ष श्री शरदराव पवार साहब ने इन सभी मुद्दों पर अपनी राय व्यक्त करते हुए कहा कि
भारतीय कुश्ती महासंघ हमारी भातृ संस्था है और भारतीय कुस्ती महासंघ के सहयोग और सहकार्य
से हि महाराष्ट्र में कुश्ती का दर्जा उंचा किया जा सकेगा तथा सन ऊंनीसो तिर्पण साल से महाराष्ट्र राज्य
कुस्तीगीर परिषद् भारतीय कुस्ती महासंघ से संलग्न है। यह संलग्नता सदैव आबादित रहने के के लिए
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद् का समझौते का प्रस्ताव भारतीय कुस्ती महासंघ के सम्मानिय
अध्यक्ष श्री बृजभूषण शरण सिंह (माननीय सांसद) से चर्चा कर हम इन सब गलतफहमी तथा
घटनाक्रमों पर पर्दा डालकर आनेवाले दिनों में हमारी कुस्तीगीर परिषद बिना किसी बाधा से कार्य
कर सकेगी इस विषय मे निर्णय लेंगे।
महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ में नए स्पोर्ट्स कोड को लागू करने के पहले कदम के रूप में परिषद के
अध्यक्ष श्री शरदराव पवार, कार्याध्यक्ष श्री नामदेवराव मोहिते, महासचिव श्री बालासाहेब लांडगे और
कोषाध्यक्ष श्री सुरेश पाटिल ने परिषद के कामकाज से सेवानिवृत्त होने के अपने निर्णय के बारे में
सदन को सूचित किया और साथ ही में उनकी जगह सन्मानिय सांसद श्री रामदास तडस अध्यक्ष
श्री काकासाहेब पवार कार्याध्यक्ष श्री विजय बराटे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री दयानंद भक्त महासचिव
और श्री अमृता भोसले कोषाध्यक्ष सर्वसम्मति से अनुमोदित किए गए।
तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद् के चीफ पेट्रोन के रूप में श्री शरदराव पवार और पेट्रोन के रूपमें श्री नामदेवराव मोहिते श्री बालासाहेब लांडगे, श्री सुरेश पाटिल, श्री सर्जेराव शिंदे के नामों को
सर्वसम्मति से घोषणा की गई।
सूचक:- श्री विनायक कृष्णजी गाढवे
स्वीकृत श्री गणेश संतोषराव कोहले
"संकल्प सर्वसम्मति से पारित
विषय संख्या-3 माननीय अध्यक्ष जी की अनुमति से आनेवाले विषय
संकल्प-अध्यक्ष कि अनुमती से कोई नया विषय नहीं था इसलिए अध्यक्ष की अनुमति से सभा
समाप्त कि गयी।
_____
सदर पत्र खालीलप्रमाणे
सदर गोष्टीतून नक्कीच माझ्या व तुमच्या सारख्या कुस्तीप्रेमींना आनंद वाटने साहजिक आहे.सदर निर्णयात नवीन स्पोर्ट्स कोड नुसार वयोवृद्ध व्यक्ती राजीनामे देऊन स्वतः बाहेर पडले तर त्याठिकाणी नवीन पदाधिकारी नेमून संस्थेचे काम यापुढे चालू राहील असे एकंदरीत चित्र दिसते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी कुठे होणार याबाबत अनेक प्रसार माध्यमांनी पुणे तर अनेकांनी अहमदनगर असे वृत्त दिले आहे.मात्र जर भारतीय कुस्ती संघाने सदर कारणे दाखवा नोटीस मंजूर करुन जुन्या कुस्तीगीर परिषदेची मान्यता कायम ठेवली तर मात्र अस्थायी समितीने अगोदरच महाराष्ट्र केसरी चा यावर्षीचा बहुमान पैलवान मुरलीधर अण्णा मोहोळ यांना दिला आहे त्यानुसार पुण्यातच स्पर्धा होईल असे एकंदरीत चित्र दिसते.
यावरुन महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींच्यात नक्कीच आनंदाची लाट येणार आहे.महाराष्ट्रात कुस्ती संघटना अस्थिर असल्याने पैलवानांचे अतिशय नुकसान होत होते.पडलेल्या दोन गटामुळे सरळसरळ कुस्ती क्षेत्र दोन गटात विभागले होते.यावर बुद्धिवादी मंडळींनी काढलेला हा तोडगा आणि घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र नक्कीच स्वागत करेल अशी आशा वाटते.
याबरोबरच मी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला आवाहन करेन की आपापल्या जिल्ह्यात कुस्ती क्षेत्रात काय सुरू आहे याची आपण माहिती ठेवावी.कुस्ती क्षेत्रातील अंतर्गत राजकारण काही ठराविक व्यक्तींनाच माहिती असते त्यामुळे अनेकांना संभ्रम निर्माण होतो.आपले अध्यक्ष कोण आहेत,वर्षभरात कामे काय केली,कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या तळागाळात सदर संघटना पोहोचली का हे जर साधारण कुस्ती शौकिनाना माहिती असेल तरच येणाऱ्या काळात डोळसपणे संघटनेत कामकाम चालू राहील.तालमीचे मालक आणि चालक आपापल्या तालमी सांभाळत आहेत,पैलवान घाम गाळून आपले करियर निर्माण करत आहेत,पालक आपल्या पोटाला चिमटा काढून पोरांना आर्थिक मदत करत आहेत,गावोगावी यात्रा जत्रेत लाखोंची कुस्ती मैदाने होत आहेत मात्र हे सर्व ज्या गोष्टीवर चालते किंबहुना ज्या गोष्टींमुळे यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो अशी कुस्ती संघटना सुद्धा चांगल्या रीतीने चालली पाहिजे आणि ती चालवण्याचे काम सध्याचे पदाधिकारी जोमाने करतीलच पण यात तालमीचे मालक,चालक,पालक यांनीही लक्ष घातले तर गेल्या वर्षा दीड वर्षात जी अस्थिरता माजली ती यापुढे होणार नाही आणि मग आपण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके आणेल अशी स्वप्ने डोळसपणे पाहू शकू.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे