"महाराष्ट्र केसरी" स्पर्धा पुण्यात होणार - भारतीय कुस्ती संघातर्फे पै.मुरलीधर मोहोळ यांना स्पर्धेचा बहुमान
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार हा प्रश्न अनेक कुस्ती शौकिनांच्या मनात असताना आज सकाळीच पुणे शहराचे महापौर मा.श्री.मुरलीधर मोहोळ यांना भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद देत तसे पत्र दिले.
आपण स्वतः या स्पर्धेसाठी पुण्यात उपस्थित राहू अशीही ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पै.संदीप भोंडवे,पै.योगेश दोडके, खासदार रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र केसरी