पै.किरण भगत मातीतून तर पै.राघू ठोंबरे मॅट वरुन महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून प्रतिनिधींत्व करणार

पै.किरण भगत मातीतून तर पै.राघू ठोंबरे मॅट वरुन महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून प्रतिनिधींत्व करणार
कोथरुड पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून निवड चाचण्या सुरू झाल्या आहेत. नुकतेच सातारा येथे झालेल्या निवड चाचणीत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावाचा मल्ल पै.किरण भगत याने मातीतून तर माण तालुक्यातील ठोंबरेवाडीचा पै.राघू ठोंबरे याची मॅट वरून जिल्ह्यातुन महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली आहे.
पै.किरण भगत याला कित्येक वर्षे महाराष्ट्र केसरी गदेने हुलकावणी दिली आहे.यावर्षी त्याने पुन्हा कसून करुन आपल्या नशीब आजमावण्यासाठी कंबर कसली आहे तर राघू हा मैदानी कुस्तीत चांगले नाव कमावत जोड तोडत वर निघाला आहे.
दोन्ही मल्लांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या

2 Comments

  1. 200% किरण भगत महाराष्ट्र केसरी होणार.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form