ज्येष्ठ मल्लांच्या मानधनाबाबत महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या पाठपुराव्याला यश

ज्येष्ठ मल्लांच्या मानधनाबाबत महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या पाठपुराव्याला यश
- मानधनाचा प्रश्‍न मार्गी 
- क्रीडामंत्री गिरीश महाजन साहेब यांचे निर्देश 

 राज्यातील ज्येष्ठ कुस्तीपटूंना मिळणारे मानधन आता नियोजित वेळेत मिळावे. तसेच, अर्थसंकल्पात ज्येष्ठ मल्लांच्या मानधन आणि अन्य सुविधांसाठी तरतूद करावी. त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिका-यांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 
महाराष्ट्राच्या लाल मातीत अनेकांनी मैदान गाजवले. महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीला वैभव प्राप्त करुन दिले. मात्र, उतारवयात याच मल्लांना त्यांच्या हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. अक्षरश: राज्य शासनाकडून मिळणारे मानधनही नियोजित वेळेत मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाने ज्येष्ठ मल्लांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. 

कुस्तीने महाराष्ट्राची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर करून दिली आहे. पण, ज्या मल्लांनी ही परंपरा जपली आणि जोपासली त्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळेच नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी ज्येष्ठ मल्लांच्या विविध प्रश्नांसदर्भात सविस्तर चर्चा सदनात केली. 
---- 
मार्च महिन्यापासून मानधन नाही...
राज्य सरकारकडून हिंदकेसरी' सह 30 हुन अधिक महाराष्ट्र केसरी' किताब पटकावलेल्या ज्येष्ठ मल्लांना प्रतिवर्षी मानधन दिले जाते. मात्र, या मानधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. वेळोवेळी पुरवणी मागण्यांच्या आधारे संबंधित मानधनाची एकूण रक्कम मंजूर करुन घेतली जाते. त्यानंतर क्रीडा विभागाकडून संबंधित मल्लांना मानधन दिले जाते. परिणामी, मानधन देण्यात अनिमितता आहे. गेल्या मार्च महिन्यापासून संबंधित मल्लांना मानधन मिळालेले नाही. तसेच, अनेकदा क्रीडा विभागाकडून आमच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात येते. त्यामुळे ज्येष्ठ मल्लांमध्ये राज्य शासनाप्रती नाराजीचा सूर होता. मात्र, आता क्रीडा मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे मानधनाचा विषय तात्काळ मार्गी लागणार आहे. 
------ 
लाल मातीतील कुस्ती या खेळावर महाराष्ट्रातील तमाम जनता प्रेम करते. ग्रामीण भागात हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. ग्रामीण भागातील एखादा मुलगा 15 वर्षांचा झाल्यास तो अत्यंत कष्टाने मल्लविद्येचा सराव करीत असतो. सतत 10 वर्षे मेहनत केल्यानंतर एखादा उत्तम मल्ल तयार होतो. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्येष्ठ मल्लांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांना मिळणारे मानधन वेळेत मिळावे, अशी अपेक्षा होती. आता क्रीडामंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सकारात्मक निर्देश दिल्यामुळे मानधनाचा विषय लवकरच मार्गी लाणार आहे. 


धन्यवाद..🙏💐
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form