पणुंब्रे कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पै.बालारफीक शेख विजयी - सर्व कुस्त्या निकाली झाल्याने प्रेक्षकांच्यात समाधान
जोतिर्लिंग देवाच्या याञेनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे मैदान.
वारणा खो-यातील तथा पश्चिम महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान म्हणजे पणुंब्रे वारूणचे कुस्ती मैदान होय.हिंदकेसरी , भारत केसरी , महान भारत केसरी , महाराष्ट्र केसरी मल्ल या मैदानात खेळली आहेत.अतिशय काटा जोड लढती आणि शिस्तबध्द नियोजन या मैदानात पहावयास मिळते.या वर्षीसुद्धा पणुंब्रे गावाने अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान पार पाडले .प्रमुख कुस्त्यांबरोबर लहान मोठ्या जोडीतील जवळपास १५० कुस्त्या आयोजित केल्या होत्या.
पै.विश्वास हारुगले (दादा) यांचा विशेष सन्मान
गंगावेश तालमीचे वस्ताद पै.विश्चास दादा हारुगले यांच्या कुस्ती क्षेञातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणीच्या जोरावर भारतातील अव्वल दर्जाचे पैलवान घडविल्याबद्दल शिराळा वाळवा तालुक्याचे युवक नेते , निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.सत्यजितराव देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते पै.विश्वास दादा हारुगले यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
मैदानातील प्रमुख कुस्त्यांचे निकाल पुढील प्रमाणे..
महाराष्ट्र केसरी पै.बालारफी शेख (हनुमान आखाडा पुणे) विरुद्ध पै.महान भारत केसरी पै.माऊली जमदाडे (गंगावेश तालीम कोल्हापूर)
या कुस्तीत बालारफी शेख घिस्सा डावावर विजयी..
सदर कुस्ती पहा
महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापूर) विरुद्ध पै.सागर बिराजदार (गोकुळ वस्ताद तालीम पुणे)
या कुस्तीत पृथ्वीराज पाटील घिस्सा डावावर विजयी...
सदर कुस्ती पहा खालील लिंकवर...
उपमहाराष्ट्र केसरी पै.प्रकाश बनकर (गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुद्ध पै.गणेश जगताप (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे)
या कुस्तीत गणेश जगताप प्रेक्षणिय कुस्ती करून विजयी..
सदर कुस्ती पहा खालील लिंकवर...
पै.विकास पाटील (राष्ट्रकुल कुस्ती संकुल विटा ) विरुद्ध पै.दादा सरवदे(
या कुस्तीत विकास पाटील टांग डावावर विजयी..
मल्लविद्या कुस्ती केंद्राचा पैलवान दत्ता बानकर याने पैलवान श्रेयस लवटे वर घिस्सा डाव मारुन प्रेक्षणीय कुस्ती केली.
कुस्ती पहा.
पै.अमर पाटील (गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुध्द पै.रामा कांबळे (मोतीबाग तालीम कोल्हापूर)
ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
पै.निलेश पाटील (पणुंब्रे) विरुद्ध पै.विशाल काकडे (मुरगुड)
या कुस्तीत निलेश पाटील विजयी...
पै.बाबु ढेरे (पणुंब्रे) विरुद्ध पै.दिगंबर पाटील (मोतीबाग)
ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सदर मैदानाचे Live प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर HD स्वरुपात कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभागामार्फत दाखविण्यात आले.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मैदानाचे उत्कृष्ठ समालोचन जेष्ठ कुस्ती निवेदक पै.ईश्चरा पाटील सर यांनी केले.🎙️🎙️
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद ✍️
पै.नेताजी ढेरे
उपाध्यक्ष , कुस्ती मल्लविद्या महासंघ शिराळा तालुका
पै.धनाजी पाटील✍️
प्रसिद्धी प्रमुख , कुस्ती मल्लविद्या महासंघ शिराळा तालुका