गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास दादा हारुगले यांना "आदर्श वस्ताद" पुरस्काराने सन्मानित
साधी राहणी आणि उच्च विचार ठेवत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला बलाढ्य मल्ल देणारे वस्ताद विश्वास हारुगले यांना पणुंब्रे वारुण कुस्ती मैदानात समस्त ग्रामस्थ व कुस्ती कमिटी यांच्या वतीने आदर्श वस्ताद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिराळा वाळवा तालुक्याचे युवक नेते,निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.सत्यजितराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
वस्ताद विश्वास हारुगले यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com