खाशाबा जाधव म्हणजे आमचे प्रेरणास्थान - पैलवान रवी दहिया

खाशाबा जाधव म्हणजे आमचे प्रेरणास्थान - पैलवान रवी दहिया
त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी सदैव तत्पर

टोकियो ऑलिंपिक 2020 रौप्यपदक विजेता रवींद्र दहिया याचे प्रतिपादन
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव हे नाव आमच्या रक्तात भिनले आहे.भारतीय खेल प्राधिकरणाच्या मुख्य कुस्ती हॉस्टेल ला खाशाबा जाधव यांचे नाव आजही आहे.ज्यांनी भारतातील खेळाडूंना ओलिम्पिक खेळाची वाट दाखवली असे 1952 हेलसिंकी ओलिम्पिक कांस्यपदक विजेते खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळालाच पाहिजे कारण खाशाबा जाधव नसते तर आज ओलिम्पिक खेळाची प्रेरणा आम्हाला मिळाली नसती असे प्रतिपादन टोकियो ओलिम्पिक रौप्यपदक विजेता पैलवान रवी याने केले आहे.
खाशाबाना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव व कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पैलवान संग्रामसिंह कांबळे दिल्ली मुक्कामी आहेत.त्यांनी छत्रसाल स्टेडियम दिल्ली येथे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता पैलवान रवी दहिया यांची भेट घेऊन खाशाबा जाधव यांनी जिंकलेले कांस्यपदक दाखवले.पदक पाहून रवी दहिया त्याला नमस्कार केला व खाशाबा जाधव हे माझे नव्हे तर देशातील तमाम कुस्तीगीरांचे प्रेरणास्थान आहे असे प्रतिपादन केले.पैलवान संग्राम कांबळे सरांनी कुस्ती मल्लविद्या कार्याचा आढावा त्यांना सांगितला.
कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वाटचालीबद्धल त्याने विशेष कौतुक केले.खूप वर्षांपासून आपण कुस्ती मल्लविद्या फेसबुक पेज फॉलो करत आहे व भाषांतरणाद्वारे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र समजावून घेत आहे.महाराष्ट्रतील पैलवान राहुल आवारे व त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत व राहुल हा महाराष्ट्रासह आमचा सुध्दा आदर्श पैलवान आहे असे तो आवर्जून म्हणाला.
खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी आपल्या परीने जे काही होऊ शकेल ते करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे तो यावेळी म्हणाला.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form