हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांचा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे सत्कार
तेलंगणा राज्यात झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान अभिजित कटके याने तुल्यबळ लढती जिंकत अजिंक्यपद मिळवले.त्याच्या कामगिरीचे कौतुक म्हणून आज महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ मुख्य प्रवक्ते पै.संग्रामसिंह कांबळे, कोल्हापूरचे वस्ताद बाबासाहेब राजेमहाडीक,प्रसिद्धी प्रमुख पैलवान पप्पू पवार, पैलवान सचिन भाऊ शेटे आदी मान्यवरांनी शिवरामदादा तालीम पुणे येथे हिंदकेसरी अभिजित कटके यांचा सन्मान केला.
अभिजित यापूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने कामगिरी केली आहे.त्याच्या कारकिर्दीचा गौरव नेहमीच कुस्ती मल्लविद्या द्वारे केला जात आहे.
धन्यवाद
Team kustimallavidya