भारताचे पहिले ऑलिंपीकवीर खाशाबा जाधव यांना महाराष्ट्र शासन क्रीडा विभागातर्फे रथयात्रेतून मानवंदना

भारताचे पहिले ऑलिंपीकवीर खाशाबा जाधव यांना महाराष्ट्र शासन क्रीडा विभागातर्फे रथयात्रेतून मानवंदना
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज मुंबई शिवाजी पार्क येथे भारताचे पहिले ऑलिंपिकवीर ज्यांनी 1952 हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये कुस्ती खेळात कांस्यपदक मिळवुन दिले त्यांच्या आठवणी रथ स्वरुपात बनवून त्यांना मानवंदना दिली.
खाशाबा जाधव यांनी केलेले कार्य अलौकिक आहे मात्र शासन दरबारी त्यांना नेहमी उपेक्षाच पदरी पडली.पात्र असूनही त्यांना जिवंतपणी एकही पुरस्कार दिला गेला नाही.
मरणोत्तर त्यांना अर्जुन व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासारखे पुरस्कार मिळाले.आजही त्यांचे चिरंजीव रणजित जाधव त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा म्हणून शासनाचे उंबरठे झिजवत आहेत.
आज त्यांच्या रथयात्रेतून देण्यात आलेल्या मानवंदनेच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणण्याची गरज वाटत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form