पैलवान अभिजित कटके हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये
हैद्राबाद येथे सुरू असणाऱ्या हिंदकेसरी 2023 किताबाच्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन लढवय्ये मल्ल तुफानी कुस्त्या करत वरच्या फेरीपर्यंत पोहोचले होते.
काल त्रिवार महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांनी तुल्यबळ कुस्त्या जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.या फेरीत त्यांनी भारताचा बलाढ्य मल्ल मोनू यांच्याशी तुफानी टक्कर दिली.मात्र मोनू ने गुणांच्या आधारे पै.विजय चौधरी यांच्यावर विजय मिळवला.पैलवान विजय चौधरी यांना नशिबाने जरी हुलकावणी दिली तरी त्यांची तुफानी खेळी कुस्ती शौकिनांच्या मनात कोरली गेली.
आज सायंकाळी हिंदकेसरी 2023 कोण होणार याचा फैसला होणार.महाराष्ट्राचा पैलवान अभिजित कटके विरुद्ध सोमवीर अंतिम लढत हिंदकेसरी किताबासाठी होणार आहे.
पैलवान अभिजित कटके याला कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फ हार्दिक शुभेच्छा...💐
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
www.kustimallavidya.com
Tags
हिंदकेसरी 2023