चिंचोली कुस्ती मैदान ता.शिराळा जि.सांगली | 12 फेब्रुवारी 2023| स्व.वस्ताद पै.जगन्नाथ आबा जाधव (नाना) यांच्या ५ व्या पुण्यस्मरणार्थ
🤼♂️निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान...
🗓️रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी
⌚दु.४ वाजता
🌐स्थळ :- चिंचोली ता.शिराळा जि.सांगली
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गेली पाच वर्ष अखंडपणे स्व.वस्ताद पै.जगन्नाथ आबा जाधव (नाना) यांच्या पुण्यस्मरणार्थ कुस्त्यांचे जंगी मैदान कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव आणि पै.दिनेश जाधव हे बंधु मोठ्या दिमाखात पार पाडत आहेत.अतिशय काटाजोड लढती सदर मैदानात जोडल्या जातात.स्व.जगन्नाथ जाधव (नाना) यांचा कुस्तीचा वारसा जिवंत ठेवण्याचं महत्त्वपुर्ण कार्य सुरेश जाधव आणि दिनेश जाधव यांनी केले आहे.कुस्ती क्षेञातील अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणुन पै.जगन्नाथ जाधव (नाना) यांची ओळख होती.सुरेश जाधव यांच्यासारखा उमदा आणि अभ्यासु कुस्ती निवेदक नानांनी आपल्या घरात तयार केला.जुन्या कुस्त्यांचा इतिहास नानांच्या वाणीतुन ज्यानी ज्यानी ऐकला ते भाग्यवान..
स्व.जगन्नाथ जाधव (नाना) यांच्या जाण्याने चिंचोली गावच्या कुस्ती क्षेञात पोकळी निर्माण झाली.ती पोकळी भरुन काढण्याचं कार्य सुरेश जाधव आणि दिनेश जाधव यांनी केले आहे.वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ एक भव्य दिव्य कुस्ती मैदान ते स्वत: पार पाडत आहेत.
👍सदर कुस्ती मैदानातील नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे :-
1️⃣पै.दत्ता बाणकर (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.इंद्रजीत मगदुम (मोतीबाग तालीम कोल्हापूर)
2️⃣पै.ओंकार जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)❌ पै.अमर पाटील (कापशी)
3️⃣पै.शुभम शेणवी (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.सागर पवार (वारणा)
4️⃣पै.सचिन महागावकर (मोतीबाग तालीम कोल्हापुर)❌ पै.धैर्यशील सकटे (न्यु मोतीबाग तालीम कोल्हापुर)
5️⃣पै.सॊरभ नांगरे (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.गोरक्ष पाटील (वारणा)
6️⃣पै.मयुर जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)❌ पै.राजवर्धन शेळके (मोतीबाग तालीम कोल्हापूर)
7️⃣पै.अथर्व पाटील (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.पारस आटकेकर (शित्तुर)
यासह ५५ कुस्त्यांचे आयोजन मैदानात करण्यात आले आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎥सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल व फेसबुक पेजवर Live दाखविण्यात येईल.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎙️निवेदक :- मैदानाचे आयोजक , सुप्रसिद्ध कुस्ती समालोचक , कुस्ती आणि भक्तीचा शास्ञोक्त संगम , कुस्तीचा चालता बोलता इतिहास पै.सुरेश जाधव चिंचोलीकर
🥁हलगीवादक - श्री.मारुती मोरे गारगोटी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
💪संयोजक :-
हनुमान कुस्ती आखाडा चिंचोली मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी
पै.सुरेश जाधव व पै.दिनेश जाधव मिञ परिवार व ग्रामस्थ चिंचोली