शेडगेवाडी मैदानात पै.समीर देसाई मल्लविद्या केसरी किताबाचा मानकरी

शेडगेवाडी मैदानात पै.समीर देसाई मल्लविद्या केसरी किताबाचा मानकरी...
ऑलिंपिकवीर‌ पै.बंडा पाटील (मामा) यांचा वाढदिवस आणि मल्लविद्या‌ कुस्ती केंद्र वर्धानप दिनानिमित्त कुस्ती मैदान
दरवर्षी मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडते.या वर्षी चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आणि ऑलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा) यांच्या वाढदिवसाचे ऒचित्य साधुन भव्य दिव्य मल्लविद्या केसरी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले . 
मैदानातील निकाल खालील प्रमाणे :-

महाराष्ट्र चॅम्पियन पै.समीर देसाई (रुस्तम - ए - हिंद कुस्ती संकुल पुणे) विरुद्ध युवा महाराष्ट्र केसरी पै.विष्णु खोसे (सह्याद्री कुस्ती संकुल पुणे) ही कुस्ती अतिशय अतितटीची झाली डाव प्रतिडाव सुरु असतानाच विष्णु खोसे याने एकचाक डावावर समीर यास चीत करण्याचा प्रयत्न केला माञ सतर्क समीरने खालुन डंकी मारुन विष्णु खोसे यास चीतपट केले. या कुस्तीतील विजेता‌ पै.समिर देसाई यास महाराष्ट्र‌ राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ व युवा उद्योजक मा.पृथ्वीराज गायकवाड हुपरीकर यांच्या वतिने मल्लविद्या केसरी किताब व मानाची गदा देण्यात आली.
सदर कुस्ती पहा खालील‌‌ लिंकवर...



दोन नंबरची कुस्ती पै.दत्ता बाणकर (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै.रोहीत घोरपडे (रुस्तम - ए - हिंद कुस्ती संकुल पुणे) या कुस्तीत दत्ता बाणकर घिस्सा डावावर विजयी.
तीन नंबरची कुस्ती पै. ओमकार जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै. बाला इनामदार (क्रांती कुस्ती संकुल कुंडल) या कुस्तीत ओमकार जाधव घिसा डावावर विजयी
चार नंबरची कुस्ती पै. शुभम शेणवी (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै. धैर्यशील सकटे (न्यु मोतीबाग तालीम कोल्हापूर) या कुस्तीत शुभम शेणवी गुणावर विजयी..
पाच नंबरची कुस्ती पै. सौरभ नांगरे (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै. प्रदीप पाटील (शित्तूर) या कुस्तीत प्रदीप पाटील विजयी..
सहा नंबरची कुस्ती पै. मयूर जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै. निखिल पाटील (शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपणे) या कुस्तीत मयूर जाधव विजयी..
यासह मैदानातील विजयी मल्ल -चिलेश कदम , आशितोष लाड , रितेश गावडे , आदेश मोहिते , प्रणव पाटील , अनिरुद्ध शिंदे , साहील चव्हाण , शुभम पाटील , विशाल पाटील , आर्यन शेडगे , अजिंक्य चव्हाण आदि मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या.
या मैदानातील सर्व विजेत्या मल्लांना उपमहाराष्ट्र केसरी स्व.पै.धनाजी पवार ताकारीकर यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक पै.विशाल पाटील गोटखिंडीकर यांच्या वतिने ढाल व शिल्ड देण्यात आले.
मैदानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मैदानात एकही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली नाही सर्व कुस्त्या निकाली व गुणावर झाल्या.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मैदानातील प्रमुख उपस्थिती :-
आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा) , शाहुवाडी पन्हाळा तालुक्याचे आमदार मा.विनयरावजी कोरे सावकार , शिराळा तालुक्याचे तहसिलदार मा.गणेशजी शिंदे साहेब , कुस्ती‌ मल्लविद्या महासंघ अध्यक्ष पै.गणेशराव मानुगडे , पै.सर्जेराव पाटील (दादा) , कोल्हापुर जिल्हा क्रिडा अधिकारी मा.बालाजी बरबडे साहेब , मा.तानाजी पाटील , पोलीस उपनिरीक्षक मा.विश्वास जाधव ,मा.बाजीराव शेडगे (आप्पा),मा.दिनकर शेडगे , आयुर्वेदाचार्य मा.नंदकुमार पाटील , पै.नामदेव धडाम ,सरपंच मा.तानाजी नाटुलकर , पै.आनंदा मुळीक , मा.प्रतापसिंह चव्हाण ,मा.रंगराव शेडगे, पै.आनंदा भोसले , पै.मारुती पाटील , मा.कृष्णा पाटील ,पै.समिंदर जाधव , पै.राजाराम यमगर , पै.दत्ता ठाणेकर , मा.विनायक गायकवाड , पै.सचिन बागट , पै.प्रवीण थोरात , पै.सर्जेराव पाटील ,पै.तानाजी भोसले , पै.धनाजी वाघ , आदि मान्यवर उपस्थित होते.
मैदानाचे आयोजन मल्लविद्या कुस्ती केंद्राचे वस्ताद पै.राहुल जाधव , मार्गदर्शक मा.आनंदराव पाटील यांनी केले.
संयोजक म्हणुन मा.बाजीराव शेडगे (दादा) मा.बाळासाहेब वाघमारे , मा.विकास शिरसठ ,पै.बाजीराव पाटील , पै.धनाजी जाधव ,  पै.विकास शेडगे ,पै.बाबुराव शेडगे , मा.मारुती पाटील , पै.उत्तम पाटील , पै.अनिल पाटील यांनी काम पाहिले.
मैदानाचे बहारदार समालोचन उत्कृष्ठ कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव चिंचोलीकर यांनी केले.
हलगीवादन मारुती मोरे गारगोटीकर यांनी केले.

धन्यवाद 
Team.Kusti_Mallavidya...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form