कल्याण_केसरी_२०२३ चा मानकरी ठरला पैलवान प्रतिक भंडारी

कल्याण_केसरी_२०२३ चा मानकरी ठरला पैलवान प्रतिक भंडारी
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ कल्याण डोंबिवली शहर आयोजित भव्य "कल्याण केसरी २०२३ कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
आज ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघ कल्याण डोंबिवली शहराध्यक्ष पैलवान श्री.जितेंद्र भगत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य अशा "कल्याण केसरी कुस्ती स्पर्धेत"मुंबई, 
नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर येथील पैलवानांच्या अटीतटीच्या प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या.
प्रथम क्रमांकाच्या कुस्ती मध्ये पैलवान प्रतीक भंडारे यांने पैलवान साहिल म्हात्रे याला 
एकछाक डावावर पराभूत करून प्रेक्षणीय विजय संपादन केला.
कल्याण केसरीचा मानकरी ठरलेला पै.प्रतीक भंडारी याला आमच्या हस्ते एक किलो चांदीची गदा कल्याण केसरीचा मानाचा किताब व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.

यावेळी मैदानात लहान मोठ्या शंभरहून अधिक पैलवानाच्या काटा जोड कुस्त्या पार पडल्या.

यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.अजय जाधव साहेब यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला तसेच माझ्या हस्ते विजयी पैलवानांचा ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माझ्यासमवेत कल्याण डोंबिवली महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे सर्व पदाधिकारी, पैलवान, वस्ताद, कुस्ती शौकीन मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धन्यवाद..🙏💐
पैलवान संग्राम कांबळे.✨

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form