एक पैलवान ते उद्योजक असा प्रवास करणारे पै.धैर्यशील गायकवाड मुंढवा पुणे

एक पैलवान ते उद्योजक असा प्रवास करणारे पै.धैर्यशील गायकवाड मुंढवा पुणे
पुण्यातील मुंढवा गावचे गायकवाड घराणे म्हणजे कुस्ती आणि शेतीचा छंद जीवापाड जपणारे घराणे म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक असणारे घराणे होय.त्याच घराण्यातील आमचे मित्र पै.धैर्यशील गायकवाड यांनी नुकतेच स्वतःचे पेट्रोल पंपाचे उदघाटन अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या हस्ते केले.काकासाहेबांचे शिष्य असणारे धैर्यशील गायकवाड हे छत्रपती केसरी किताबाचे मानकरी आहेत.कुस्तीनंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी गरुड भरारी मारली आहे मात्र कुस्तीवरील प्रेम तिळमात्रही कमी झाले नाही.उद्योग क्षेत्राच्या लाटेत विद्यानागरी पुणे आता उद्योगनगरी म्हणूनही ओळखली जात आहे.मात्र अश्या नगरीत स्वतःजवळ असणारी सोन्याच्या किमतीची जमीन न विकता त्यात आजही ते शेती करतात.
धैर्यशील चे वडील पै.आप्पासाहेब गायकवाड हे नामवंत पैलवान होते मात्र कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित शेती आणि दुधाचा व्यवसाय जोमाने सांभाळला.धैर्यशील चे आजोबा बाळासाहेब मात्र मोठे पैलवान होते.कुस्तीसह त्यांनी प्रगतशील शेतकरी असाही नावलौकिक मिळवला होता.त्याकाळची पुण्यातील जगोबादादा या ऐतिहासिक तालीमीत ते नित्यनियमाने जात असे.
पहाटे उठून जनावरांच्या धारा काढून ते पुण्यात सायकलवरुन जात असे.त्यांच्यानंतर हाच दुग्ध व्यवसाय धैर्यशील चे वडील व स्वतः धैर्यशील इथवर सुरू आहे.पिढ्या जर कर्तबगार असतील तर घराणे संपन्न होते.धैर्यशील च्या बाबतीत असेच म्हणावे लागेल.घरची कुस्ती, दुगधव्यवसाय आणि शेती तिन्हीही त्यांनी जपली,जोपासली आहे व याही पुढे जाऊन आता पेट्रोल पंप सारळे तत्सम उद्योग जे बदलत्या पिढीसाठी पूरक आहेत अशाही व्यवसायात पदार्पण केले आहे.
"सिताई" नावाने सुरू केलेला पेट्रोल पंप उद्योग हा त्यांच्या घराण्याची मूळ प्रेरणा म्हणजे आजोबा बाळासाहेब गायकवाड यांची पणजी असणाऱ्या "सिताई" यांच्या नावाने केला आहे.याचे कारण असे की सिताईनी त्याकाळी 2 म्हैशी घेऊन कष्ट करुन दुगव्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.बलदंड पिढी घडवली व संस्कार देऊन घराण्यचा कुस्तीचा,शेतीचा व फुलांचा व्यवसाय भरभराटीस आणला.त्यांची आठवण म्हणून पै.धैर्यशील गायकवाड भैय्यानी पेट्रोल पंपास सिताई नाव दिले. एकीकडे भाऊ भावाला ओळखेना अशी स्थिती समाजात पहायला मिळते तिथे धैर्यशील ने आजोबांची पणजी जिने केलेल्या कष्टामुळे आज आपल्याला हे दिवस पहायला मिळत आहेत याची जाणीव ठेवली ही गोष्ट नक्कीच येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारी आहे असे मला वाटते.
पै.धैर्यशील गायकवाड सरतेशेवटी बोलताना म्हणाला की मी व्यवसाय उद्योगात कितीही पुढे गेलो तरी कुस्तीला विसरणार नाही.मुंढवा गावातील नवीन पुढीला कुस्तीसाठी मार्गदर्शन व दरवर्षी कुस्त्यांचा आखाडा मोठ्या प्रमाणात भरवण्यास मदत करणार असे तो यावेळी म्हणाला.
पै.धैर्यशील भैया गायकवाड यांच्या नवीन उद्योगास कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक शुभचिंतन. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून कुस्ती क्षेत्राचीही सेवा अविरत घडावी अशी आशा वाटते.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form